–माजी नगराध्यक्ष शिवसेनेच्या बाणावर न लढल्यास काय तयारी आहे?
-जिल्हा प्रमुख म्हणून अनिल जगताप यांची तयारी कशी असेल?
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शिवसेनेच्या प्रभारी बीड जिल्हा प्रमुखपदी अनिल जगताप यांची निवड झाली असून शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. परंतु अनिल जगताप यांच्यासाठी बीड नगर पालिकेची निवडणूक महत्वाची ठरणार आहे. गेल्या वेळेस माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर हे राष्ट्रवादीत होते. परंतु यावेळेस ते शिवसेनेत असले तरी त्यांनी मध्यंतरी जे प्रवेश घेतलेले आहेत ते प्रवेश शिवसेनेत घेतलेले नाहीत. यामुळे त्यांनी जर बाणावर निवडणूक लढवली नाही तर एक जिल्हा प्रमुख या नात्याने अनिल जगताप यांनी काय नियोजन केले आहे. या निवडणूकीत यश संपादन करण्यासाठी ते काय करणार आहेत यासह इतर प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागले आहेत. याच निवडणूकीवर दादांचे भवितव्य ठरणार असल्याचेही बोलले जात आहे.
बीड नगर पालिका व जिल्ह्यातील इतर पाच नगर पालिकांच्या निवडणूका मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील व राज्यातील नगर पालिकांच्या मुदत संपल्यामुळे त्या त्या नगर पालिकांवर प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. बीड नगर पालिकेवर सुद्धा प्रशासक म्हणून नामदेव टिळेकर हे काम पाहत आहेत. लवकर होणाऱ्या निवडणूकांसाठी प्रत्येक जण मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. यात येथील सर्वच पक्ष आप-आपल्या परिने कामाला लागलेले आहेत. नुकतीच बीड जिल्हाप्रमुख म्हणून अनिल जगताप यांची निवड झाली असून त्यांना याच पदावर काम केल्याचा 9 वर्षाचा चांगला अनुभव आहे. परंतु बीड नगर पालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांनी काय नियोजन केले आहे. किंवा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी जर बाणावर ही निवडणूक लढवली नाही तर एक जिल्हा अध्यक्ष म्हणून कशा प्रकारे नियोजन आहे. जर नियोजन केले नसेल तर नियोजन करणार आहेत का? यासह इतर प्रश्न या निवडणूकीच्या अनुषंगाने सच्चा शिवसैनिकाच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत.
ह्या निवडणूकीवर दादांचे भवितव्य ठरणार
बीडच्या शिवसेना जिल्हा प्रमुखपदी जो कोणी येईल तो आमदारच होतो याची अनेक उदाहरण आपल्याकडे आहेत. माजी राज्य मंत्री सुरेश नवले हे सुद्धा सुरुवातीला जिल्हा प्रमुखच होते तसेच माजी आमदार सुनिल धांडे ह्यांनी सुध्दा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेले आहे. यामुळे या पदावर काम करणारी व्यक्ती आमदार होण्याची परंपरा आहे. 9 वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केल्यानंतर परत अनिल जगताप यांना प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. यामुळे ते ह्या संधीचे सोने करतात का? हे पाहणे सुद्धा गरजेचे ठरणार आहे. यासह येणारी बीड नगर पालिकेची निवडणूक सुद्धा अनिल जगताप यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.