प्रारंभ वृत्तसेव
मुंबई : गरीब मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजे गेल्या चार दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. त्यांनी महत्वांच्या मागण्या राज्य सरकारकडे मांडल्या होत्या. त्यातील काही मागण्या सरकारने मार्गी लावल्याअसून त्या पुढील प्रमाणे आहेत. सारथी संस्था मजबुत करण्यात येणार, सारथी मार्फत विविध योजना राबविण्यात येणार, सारथीतील रक्त पदे भरण्यात येणार, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 120 कोटी रुपये देण्यात येणार, प्रत्येक जिल्ह्यात मराठा वस्तीगृह उभाण्यात गती देणार, सध्या जी वस्तीगृह उभाण्यात आलेली आहेत ती वस्तीगृह गुडीपाडव्या दिवशी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरु करण्यात येणार. यासह मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार तसेच इतर मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यामुळे छत्रपती संभाजी राजे यांनी आज (ता. 28) संध्याकाळी 5;45 ला मागे घेतले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारने आभार मानले.