सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मध्यराञी गुन्हा नोंद करण्यात आला
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालय परिसरात शुक्रवारी (ता. २५) झालेलेल्या गोळीबार प्रकरणात जखमी सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन माजी.नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, सतीश पवार, प्रमोद पवार, विनोद पवार, रवी पवार, आदित्य पवार यांच्यावर ३०७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहराच्या मध्यभागी व विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काल गोळीबार झाला अन् सर्व शहर हादरुन गेले. ऐवढ्या महत्वाच्या ठिकाणी गोळीबार होणे म्हणजे खुप जास्त झाले असे म्हणावे लागेल. सकाळी ११ ला झालेल्या प्रकरणात राञी उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. जखमी सतीश क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या आठ दिवसापुर्वी आम्ही बंगल्यावर गेलो होतो यावैळी आम्हाला भारतभुषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांनी धमकी दिली होती की, येणार्या आठ दहा दिवसात आम्ही काय आहेत हे तुम्हाला दाखवू. यानंतर काल आमच्यावर हल्ला झाला. सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरीन काल राञी उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलिस करत आहेत.