पाणी असून सुद्धा नागरीकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागतेय
पाण्याचे वेळापत्रक नसल्यामुळे पाणी येते कधीही
अनेक भागात वेळेवर स्वच्छता होत नसल्यामुळे साथीचे रोग वाढले
अनेक भागात अजून घंटा गाडीच येत नसल्यामुळे नागरीकांना अडचणप्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरातील नागरीकांनी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना तब्बल 30 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती. परंतु नगराध्यक्ष भारतभुषण यांना साध्या नागरीकांच्या समस्या सोडवता आल्या नाहीत. वारंवार तक्रारी, निवेदन देऊन सुद्धा त्या त्या भागातील प्रश्न सोडवले गेले नाहीत. मोठ्या अपेक्षांनी शहरकरांनी भारतभुषण यांच्याकडे बीड नगर पालिकेची सत्ता दिली होती. परंतु नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसगार यांनी शहरकरांची निराशाच केली. सध्या बीड शहरात विविध समस्या निर्माण झालेल्या असताना सुद्धा या सर्व समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. पाणी उपलब्ध असून सुद्धा नागरीकांना वेळेवर पाणी मिळत नाही, अनेक भागातील स्वच्छता वेळेवर होत नाही, अनेक भागातील खराब रस्ते दुरुस्त होत नाहीत, पाण्याचे वेळापत्रक नसल्यामुळे नागरीकांना वेळेनुसार पाणी उपलब्ध होत नाही यासह इतर समस्या शहरात निर्माण झाल्या असताना सुद्धा या सर्व प्रश्नांकडे नगरराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी दुर्लक्ष केलेले आहे. यामुळे येणाऱ्या निवडणूकीत त्यांना याचा फटका बसणार यात शंका नाहीच.
गेल्या 30 वर्षापासून बीड नगर पालिकेची सत्ता नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्याकडे आहे. या दरम्यान त्यांना विविध प्रश्न मार्गी लावता आले असते, परंतु यात त्यांना अपयश आले आहे. सन 1989 मध्ये निकृष्ट दर्जाचे ब्लिचिंग पावडर व त्रुटीमुळे दूषित पाण्यामुळे बीड शहरातील जवळपास 56 लोक कावीळ सारख्या साथीच्या रोगाने मृत्युमुखी पडले होते की नाही, याची जबाबदारी कोणाची? माजलगाव व पाली चे तलाव तुडुंब भरलेले असताना गेल्या दोन वर्षापासून पिण्याचे पाण्यासाठी बीडच्या जनतेला पंधरा पंधरा दिवसाला, दूषित पाणी पाजून दर्दर भटकंती का करावी लागली? शहराची हद्द वाढीच्या दृष्टीने कलम 49,50 प्रमाणे आपण आऊट कट शेत्रा मध्ये पिण्याचे पाण्यासाठी अतिरिक्त पाइपलाइन का केली नाही? कलम 200 ते 211 अकरा पर्यंत नाल्या व मोरया चे कामावर आपली गेल्या तीस वर्षात आपले नियंत्रण होते का नगरसेवक व अधिकार्याचे? नगरपरिषद अधिनियम आणि 19 65 प्रमाणे शहराचा कचरा पासून घनकचरा करण्यासाठी नगरपरिषद चा टीचिंग ग्राउंड नाही. घनकचरा प्रकल्पासाठी शासनाने कोट्यावधी रुपये आले ते घन कचरा प्रकल्प कोठे आहे? ओल्या कचर्यापासून वीज निर्मिती करा व हे करण्यासाठी 58 लाखाचा वीज प्रकल्प कोठे आहे? मोकाट जनावरासाठी कोंडवाडा बांधणी कायद्यान्वये बंधनकारक असताना आपण तीस वर्षात कोंडवाडे बांधले किती? नगरपरिषद पाईपलाईनचे 20 कोटी रुपयांचे टेंडर चे ई टेंडर न करता नियम बाहय आठ तुकडे पाडून 54 टक्के जास्त दराने टेंडर नगर परिषदेने आपण दिले का? नाही.? गेल्या दहा वर्षाचे विकासाच्या गप्पा ऐकून कान सुन्न झाले आहेत आता बीड नगर परिषद चे नागरिक तीस वर्षाचे कामाचा हिशोब मागणार कारण की गेल्या दहा वर्षापासून पुन्हा काका-पुतण्याच्या राजकीय वादात शहरातील रस्त्यावर व नाल्याची दुर्दशा घाणीचे साम्राज्य पिण्याचे पाणी ची अवस्था तलावात पाणी असूनही आपण नियमित पाणी मिळत नाही नागरिकाला ह्या मुलभूत सुविधा सुद्धा मिळत नाही म्हणून हे कायद्याशी प्रश्नावली भारत भूषण समोर जागृक नागरिक म्हणून नैतिकतेच्या आधारावर ठेवीत आहे असे प्रसिद्धीपत्रकात माजी नगरसेवक खालेक पेंटरने प्रसिद्धीस दिले आहे.
शहरातील भाजी मंडई घाणीत
बीड शहरातील नागरीकांना भाजी पाला खरेदी करण्यासाठी विविध समस्यांना सामना करावा लागतो. यासह ग्रामीण भागातील येणाऱ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा भाजी पाला विक्रीसाठी बसताना स्वच्छ जागा मिळत नाही. बीड शहरातील नवी भाजी मंडई या ठिकाणी कोटी रुपये खर्च करुन, त्या ठिकाणी भाजी मंडईसाठी इमारत उभारण्यात आलेली आहे. परंतु त्याची योग्य देखभाल न झाल्यामुळे ती जागा वापराविना तशीच पडून आहे. यासह कॉफी सेंटर परिसरात सुद्धा भाजी मंडईसाठी एक इमारत उभारण्यात आलेली आहे. परंतु ही इमारत सुद्धा तशीच धुळखात पडून आहे. यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य एक प्रकारे धोक्यात आलेले आहे. परंतु यासर्व बाबींकडे नगराध्यक्ष भारतभुषण यांच्याकडून दुर्लक्ष झाले.
शहरात महिलांसाठी शौचालय नाहीत
बीड शहरातील महत्वांच्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय उभारण्यात आलेली नाहीत. यात विशेष म्हणजे नगर पालिकेच्या वेबसाईटवर मात्र शहरात 25 शौचालय असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे कागदावर शौचालय दाखवून फक्त स्वच्छतेच्या नावावर पैसे उचलण्याचा हा प्रकार दिसून येत आहे. तर दुसरीकडे महिलांसाठी शौचालय नसल्यामुळे महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी सुद्धा नागरीकांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा हा प्रश्न मार्गी लागलेना नाही.