बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील ईट येथे युवा नेते डॉ.योगेशभैय्या क्षीरसागर यांनी बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट देवून शहराच्या 2050 च्या लोकसंख्येचा विचार करून तयार करण्यात आलेला हा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झालेला असुन अमृत अटल योजनेअंतर्गत हे काम झालेले आहे.याप्रसंगी येथे आज टेस्टिंग करुन पाणी दाखल झाल्यानंतर डॉ योगेश क्षीरसागर यांनी सहकाऱ्यांसमवेत जलपुजन केले. तसेच संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली.बीडकरासाठी हा मोठा ऐतिहासिक क्षण असून लोकनेते जयदत्तआण्णा क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी ठेवलेल्या दुरदृष्टीतुन ही योजना पूर्ण झाली आहे.
सदरील योजनेच्या नवीन फिल्टरची क्षमता ही 25 MLD म्हणजेच 2 कोटी 50 लाख लिटर असणार आहे. विशेष म्हणजे येथे सोलार प्लांट बसवला असल्याने मोठ्या प्रमाणात विद्युत बचत होण्यास मदत होणार आहे. ही योजना बीडच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. जलपूजन करतांना अत्यंत आनंद होत असून प्रतीक्षेत असलेल्या पाणी पुरवठ्याचे काम आता पूर्ण होत आहे असे डॉ क्षीरसागर यांनी म्हटले आहे
सदरील योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिवस 135 लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच पाणी पुरवठ्याचा कालावधी देखील कमी होणार आहे.
याप्रसंगी जि.प.सदस्य गणपत (आप्पा) डोईफोडे, बांधकाम सभापती विनोद मुळूक, नगरसेवक इकबाल शेख, मुखीद लाला, रवींद्र कदम, शुभम धुत, विकास जोगदंड, प्रभाकर पोपळे, भैय्या मोरे, गणेश तांदळे, रंजित बनसोडे, उपसरपंच अरुण बोंगाने,कार्यकारी अभियंता पी.जी.जोगदंड, उप कार्यकारी अभियंता राख एस.सी, शाखा अभियंता एम. एस. वाघ, अमोल बागलाने आदी उपस्थित होते.