राजकीय दबावामुळे गुन्हा नोंद होण्यास होत होता विलंब?
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील द्वारकादास मंञी नागरी सहकारी बॅंकेत ३१६ कोटी गैरव्यवहार झाल्यामुळे बॅंकेवर प्रशासक नेमण्यात आले आहे. याच प्रशासकाच्या फिर्यादीवरुन आज दुपारी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हे नोंद करण्यात आले. या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्यामूळे गुन्हा नोंद होण्यास विलंब होत होत होता?
मंञी बॅंकेतील ३१६ कोटी गैरव्यवहार प्रकरण आता बॅंकेचे संस्थापक सुभाष सारडा यांना चांगले भवले आहे. येथील ३१६ कोटीच्या गैर व्यवहारा प्रकरणी सुभाष सारडा सह संचालक मंडळावर आज दुपारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात विशेष म्हणजे रिझर्व्ह बॅंकैसह न्यायलयाने या प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते, तरी माञ गुन्हे नोंद होण्यास विलंब होत होता. माञ संस्थापक, २३ संचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी, चार शाखा अधिकारी यांच्यावर 420, 477 A कलमानूसार गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे दोषींचे माञ धाबे दणाणले आहेत.