हे असेच चालले तर सर्वसामान्यांचा कायद्यावर विश्वास राहणार नाही
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : दोन दिवसापुर्वी केज पोलीस ठाण्यात 30 लाखाच्या अवैद्य गुटखा प्रकरणी चार जणांवर गुन्हे नोंद झाले होते. यातील एकाला अटक करण्यात आली असली तरीही, अजून तीन जणांना अटक करण्यात आलेली नाही. आरोपी सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून त्यांना एक न्याय व इतरांना एक न्याय असे आहे का? कायद्यासमोर सर्व समान, यामुळे जे देोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणे आहे.
शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर केज पोलीस ठाण्यात दोन दिवसापासून अवैद्य गुटखा प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परंतु अजून सुद्धा खांडे यांना यात अटक करण्यात आली नाही. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत म्हणून त्यांना अटक होत नाही का किंवा पोलीसांवर राजकिय दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे का? यासह इतर प्रश्न याठिकाणी उपस्थित होऊ लागले आहेत. पोलीस अधिक्षक साहेब या प्रकरणात जे आरोपी असतील, त्यांना तात्काळ अटक करा नसता कायद्यावर असणार सर्व सामान्यांचा विश्वास राहणार नाही.
कायद्याची भिती राहली नाही!
आज शिवसेनेचे सचिव तथा मा.खासदार सुभाष देसाई हे बीड याठिकाणी आले असता, त्यांचा सत्कार करताना बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे त्याठिकाणी दिसले. एखादा व्यक्ती गुन्हा करतो, दोन नंबरचे धंदे करतो, पोलीसांनी माल पकडल्यावर हा माल कुंडलिक खांडेंचा आहे जा म्हणावे पोलीसांना असे म्हणतो, गुन्हा नोंद होऊनही पोलीसांच्या समोर फिरतो तरीही पोलीस कारवाई का करत नाही. कायदा फक्त सर्व सामान्यांसाठीच आहे का? हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. कायद्याची भितीच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे राहीलेली दिसत नाही. परंतु अजून सुद्धा पोलीस खात्यात वर्दीची लाज राखणारे अनेक अधिकारी कर्मचारी आहेत.