निराधारांना आधार देत दिपावलीचा स्नेह कायम…आ.विनायकराव मेटे
बीड : शिवसंग्राम भवन, नगर रोड बीड येथे दिवाळी निमित्त आयोजित स्नेहमिलन व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्नेहमिलनाला ह.भ.प.शिवाजी महाराज,नारायण गड संस्थान यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजयांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून. कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांच्यासह ह.भ.प महादेव महाराज चाकरवाडीकर ह.भ.प महादेव महाराज बेलेश्वर,ह.भ.प भक्तीदास महाराज,बेलखंडी पाटोदा, ह.भ.प नारायण महाराज डिसले,दगडवाडी संस्थान,ह.भ.प नाना महाराज कदम, नेकनुर, ह.भ.प नवनाथ महाराज गोरक्षनाथ टेकडी, ह.भ.प डोंगरे महाराज,गौतम ऋषी संस्थान,ह भ प स्वामी योगीराज महाराज रामगडकर, ह भ प नवनाथ महाराज, अंथरवण पिंपरी,यासंत महंतांनी शुभ आशीर्वाद दिले.राष्ट्रवादी व काँग्रेसचे माजी आमदार व वंचितच्या नेत्यांनीही हजेरी लावली. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जगताप, काँग्रेसचे माजी आमदार सिराज देशमुख, वंचितचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे,एमआयएमचे शेख शफीक,यांच्यासह जिल्ह्यातील विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी आ. विनायकराव मेटेंच्या निमंत्रणाला मान दिला आणि व्यासपीठावर हजेरी लावली.यादरम्यान शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांनी सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप केले.
यावेळी आ.विनायकराव मेटे यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला. आर्यन खानच्या १५ ग्रॅम गांजासाठी देशाला वेठीस धरले जाते. पण, जिल्ह्यात शेकडो किलो गांजाची झाडे सापडत आहेत. यावर कोणतीच यंत्रणा का लक्ष देत नाही, त्याची चर्चा का होत नाही, वर्षभरात जिल्ह्यात दोनशेंवर शेतकऱ्यांनी आत्महत्या करुनही त्याची चर्चा व दखल का घेतली जात नाही, असा सवालही आ. मेटे यांनी केला. जिल्ह्यात महिला अत्याचार वाढले आहेत. अल्पवयीन विवाहितेवर सहा महिन्यांत चारशेंहून अधिक वेळा बलात्कार झाला, याची दखल का घेतली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
एकिकडे सगळे घटक दिवाळीचा आनंद लुटत असताना शेतकरी व एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होत आहे. ३५ ते ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुनही दखल का घेतली जात नाही, असेही आ.मेटे म्हणाले. त्यांनी बीडच्या स्थानिक राजकारणातही हात घालत शहरातील अस्वच्छता, दुर्गंधी व त्यामुळे वाढलेल्या रोगराईला नगर पालिका कारणीभूत असल्याचा आरोप केला. यासाठी बदल घडविण्याचे आवाहन करत राजकारणापलिकडे एकत्र येऊन परिवर्तन घडवणे हे काळाची गरज आहे त्यासाठी महिलावर्ग तरुण मंडळी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनीही आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
याप्रसंगी बीड शहरातील जिव्हाळा या बेघर निवासी केंद्र, नवी भाजी मंडई,बीड येथील 45 निराधार पुरुष व महिलांना आ.विनायकराव मेटे यांचे हस्ते ब्लॅंकेटचे वाटप करून त्यांना आदरपूर्वक स्नेहभोजन देण्यात आले.स्नेहभोजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंग्राम चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.