येडेश्वरी साखर कारखान्याचा ८ वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न
केज प्रतिनिधी :
केज तालुक्यातील आनंदगाव सा.येथील येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ चा आठवा गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प.श्री.श्रीराम श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प.श्री. अर्जुन महाराज लाड, ह.भ.प.श्री. किसान महाराज पवार, ह.भ.प.श्री. महादेव महाराज बोराडे, ह.भ.प.श्री. श्रीकृष्ण महाराज चवार यांच्या शुभआशीर्वादाने व येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.
प्रारंभी पारंपरिक पद्धतीने ह.भ.प.श्री.श्रीराम श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प.श्री. अर्जुन महाराज लाड, ह.भ.प.श्री.किसन महाराज पवार, ह.भ.प.श्री. महादेव महाराज बोराडे, ह.भ.प.श्री. श्रीकृष्ण महाराज चवार यांच्या हस्ते काटापूजन,गव्हानपूजन करून गव्हाणीत मोळी टाकण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे,जिल्हा परिषद अध्यक्षा पती शिवाजी सिरसाट,जेष्ठ नेते नवाब मामू ,सुरेश तात्या पाटील ,जिल्हा परिषद सदस्य शंकर आण्णा उबाळे,बाळासाहेब शेप,रामप्रभू सोळुंके,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर,कारखान्याचे संचालक श्रीकृष्ण भवर ,तालुकाध्यक्ष नंदुदादा मोराळे, युवक तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे, संजय गांधी निराधार समिती केजचे अध्यक्ष बालासाहेब दादा बोराडे,माजी सभापती अशोक तात्या तारळकर, खरेदी विक्री संघाचे संचालक विलास जोगदंड, अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बबन भैय्या लोमटे,राष्ट्रवादी महिला काँग्रेस बीड जिल्हाध्यक्षा संगीताताई तूपसागर, हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष शरीफ सय्यद, केजचे शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड, अंबाजोगाई शहराध्यक्ष अलीम सय्यद, केज महिला तालुकाध्यक्षा संजीवनीताई देशमुख , केज शहराध्यक्षा शितलताई लांडगे, तसेच सर्व पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,चेअरमन,संचालक,ऊस उत्पादक शेतकरी,कर्मचारी, ऊसतोड मजूर व येडेश्वरी परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.