पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान: रस्त्यांची झाली चाळणी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात झालेल्या पावसाने येथील शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झालेले आहे. यासह पावसाच्या पाण्यामुळे येथील रस्त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच अजून सुद्धा येणारे दोन दिवस पावसाने असणार असा अंदाज हवामान विगाने दिला आहे. यामुळे जिल्ह्यात आता समस्यांचा महापूर येणार असल्याचे चित्र दिसत आहे. येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत. यासह पावसाच्या पुरात वाहून गेलेले पुल, खराब झालेले रस्ते, वाहून गेलेली जमिन यासह जे काही नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन ती कामे करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात तसा पाऊस कमी पडत असतो, परंतु सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यामुळे आता पावसाचे पाणी थेट शेतात व रस्त्यावर येऊ लागले आहे. सर्वच प्रकल्प भरल्यामुळे जिल्ह्यातील विविध नद्यांना पुर येत आहे. यासर्व परस्थितीमुळे जिल्ह्यात पाणी साठा झाला असला तरी जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने तर अनेक गावांचा सपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यात वाहून तीन जणांचा मृत्यू झाला तर बीड शहरातील दगडी पुलावरुन सात ते आठ जनावरे वाहून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यासह शेतात पाणी शिरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अनेक गावांना जोडणारे पुल सुद्धा कमकुवत झालेले आहेत, रस्त्यांची तर वाट लागलेली आहेत. यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात समस्यांचा महापुर येणार हे निश्चित आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने तात्काळ जिल्ह्याला मदत करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील सध्याचे चित्र
–जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प भरले
–अनेक ठिकाणचे पुल कमकुवत बनले
–पूराच्या पाण्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
-हातात आलेली पिके गेली
–रस्त्यांची लागली वाट
–शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त
-अनेक गावांना पूराचा धोका कायम
-गेवराई तालुक्यातील काही गावात पूराचे पाणी शिरले
–बीडकरांना सुद्धा पुराचा धोका कायम
–जिल्हा प्रशासन अलर्ट मोड मध्ये