प्रारंभ वृत्तसेवा
बीड: केंद्रिय मंञी मंडळात झालेल्या फेरबदलात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाले असून शनिवारी (ता. १०) २५ भाजपा पदाधिकार्यांनी राजीनामे दिले आहेत. याच अनुषंगाने येथील भाजया आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा राजीनामे द्यावे अशा मागणीच्या पोस्ट आता सोशल मिडियावर फिरु लागल्या आहेत.
बीडच्या माझी खासदार पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर न घेता इतरांना संधी देण्यात आली होती. यानंतर आता केंद्रात सुद्धा खासदार प्रितम मुंडे यांना न घेता खासदार भागवत कराड यांना संधी दिले. सतत भाजपा कडून होत असलेल्या प्रकारामुळे[jeg_weather location=”” auto_location=”false” count=”4″ item=”show”] जिल्ह्यातील मुंडे समर्थक आक्रमक झाले असून काल जिल्ह्यातील ११ तालुकाअध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. पंकजा मुंडे यांना नाराजी दाखवता येत नसली तरी मुंडे समर्थक माञ उघड उघड नाराजी व्यक्त करु लागले आहे. सध्या सोशल मिडीयावर विविध पोस्ट फिरत असून त्यात जिल्ह्यातील इतर पदाधिकार्यांनी राजीनामे द्यावे, यापुढील_ काळात पंकजाताई साहेबांच्या सभा मागताना राजीनाम्याचा_ विचार_ नक्की करावा लागेल अशा मजकुर त्यात आहे.