प्रारंभ वृत्तसेवा
जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न
देवस्थानाच्या जमिनी खाणाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न
जिल्ह्याचा विकास
येथील ऊसतोड कामगारांचा प्रश्न
जिल्ह्याला चांगले अधिकारी द्या
जिल्ह्यातील भ्रष्टअधिकारी यांच्या कारवाई
बीड : राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब आपण आज बीडच्या दौऱ्यावर आहात ही बाब चांगली आहे. परंतु दादा आपण फक्त खरीप हंगामा व कोव्हीडचा आढावा घेणार आहात हे आपल्या दौऱ्याच्या पत्रातुन कळाले. परंतु दादा जिल्ह्यात सध्या विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्हाकरांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आपण त्या प्रश्नांकडे लक्ष दिले तर ते सर्व प्रश्न सहज मार्गी लागु शकतात. यामुळे जिल्ह्यात आलाच आहात तर या प्रश्नांकडे लक्ष द्याच.
सध्या जिल्ह्यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा आहे. यामुळे येथील युवकवर्ग आपल्या मोठया शहराकडे धाव घेत आहे. यामुळे जिल्ह्यातील कुटूंब पद्धत कालबाह्य होऊ लागली आहे. जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. जिल्ह्यात रेल्वे आली तर येथील अनेकांच्या हाताला काम मिळेल. जिल्ह्यात अनेक अधिकारी काहीच कामाचे नाहीत. अशा नालायक अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक कामे खोळंबलेली आहेत. यासह भ्रष्टअधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यात चांगले अधिकारी द्या. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार हा गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागात येऊन उपजिवीका भागवत आहे. या ऊसतोड कामगांराचा प्रश्न आपण मार्गी लावावा यासह इतरही प्रश्न जिल्ह्यात निर्माण झालेले आहे. आपण बीडला आलाच आहात तर ह्या प्रश्नांकडे लक्ष द्याच अशी मागणी जिल्हाकर करत आहेत.