देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. कोविडसंदर्भात नियुक्त मंत्रिगटाच्या २०व्या बैठकीला ते संबोधित करत होते.
कोविडचे बाधासक्रीय रुग्ण तसंच नवबाधित रुग्ण यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर दिवसेंदिवस सुधारत आहे असं ते म्हणाले. कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या गेले सलग २५ दिवस नवबाधितांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशात बाधासक्रीय रुग्णांची संख्या १४ लाख असून त्यातले ८३ टक्के रुग्ण १० राज्यांमधे आहेत.
कोरोनासंसर्गाचं निदान लवकर व्हावं याकरता चाचणी करण्याची क्षमता वाढवण्यात आली असून आतापर्यंत ३६ कोटी नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत अशी माहिती डॉ हर्षवर्धन यांनी दिली.
[table id=1 /]
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लशीकरण हे महत्त्वाचं शस्त्र असून आतापर्यंत कोविडप्रतिबंधक लशीच्या २३ कोटी पेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचं जनुकीय प्रारुप बदलतं असल्यानं त्यावर देशातल्या २८ प्रयोगशाळांमधे सातत्याने संशोधन चालू आहे असं त्यांनी सांगितलं.