आकडा कमी होत नसल्यामुळे आरोग्य यंञणेवर पडतोय ताण
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : आज जिल्ह्यात परत कोरोनाचा आकडा वाढला असून पाठवलेल्या स्वॅब पैकी २६.४२ टक्के रिपोर्ट हे पाॅझिटिव्ह आले आहेत. आकडा कमी होत नसल्यामुळे याचा ताण आरोग्य यंञणेवर पडु लागला आहे.
आज आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या ४२४२ अहवालापैकी ३१२१ अहवाल निगेटिव्ह आले तर ११२१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई २१२, आष्टी १९८, बीड १६१, धारुर ५७, गेवराई १०१, केज ८७, माजलगाव ६४, परळी १२५, पाटोदा ५१, शिरुर ३७, वडवणी २८ असे रुग्ण जिल्हाभरात वाढले.