केंद्र सरकारच्या आवाहानानंतर कंपनीने दर कमी केले
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने रेमडेसिवीरची मागणी वाढली होती. आवक कमी व मागणी वाढल्यामुळे राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला होता. यासह दर सुद्धा जास्त होते. यामुळे सर्व सामान्यांची यात हेळसांड होत होती. परंतु आता काहीसा दिलासा रग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आवाहानानंतर रेमडेसिवीरचे दर कमी करण्याचा निर्णय कंपन्यांनेी घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशात निर्माण झालेल्या रेमडेसिवीरच्या तुटवडा बाबत विविध बैठका घेत, देशात रेमडेसिवीरचे उत्पन्न वाढवण्याबरोबर निर्यात बंदी केली आहे. यासह रेमडेसिवीरचे दर कमी करण्याचे आवाहान सुद्धा त्यांनी येथील कंपन्यांना केले होते. यानुसार आता त्याचे दर कमी करण्यात आले असल्याची माहिती डॉ हर्षवर्धन यांनी दिली आहे.