जिल्हा रुग्णालयाचा जीवघेणा प्रकार
– अँड. अजित देशमुख
बीड ( प्रतिनिधी ) दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत आणि तेवढ्याच गलथान कारभार जिल्हा रुग्णालयात चालू आहे. आता तर चक्क कोरोना पॉझिटिव्ह नसलेल्या व्यक्तीला कुठलीही चाचणी न घेता चक्क दोन दिवस आणि दोन रात्र कोरोना वार्डात ऍडमिट करून ठेवले. आम्ही सांगितल्यानंतर त्यांची टेस्ट घेतली आणि त्यात टेस्टमध्ये तो पेशंट निगेटिव्ह आला. तरीही त्याला नंतर दहा तासांनी सोडले. जिल्हा रुग्णालयाने हा भोंगळ कारभार तात्काळ थांबावावा. चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
दरम्यान परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दवाखान्याला भेट देवून तेथील प्रशासनाला तंबी देऊन कारभार सुधारण्यासाठी सूचना दिल्या. ही बाब आज आपण विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना आज रात्री सांगणार आहोत.
एका रुग्णाला थोडा आजार जाणवला. त्यामुळे त्यांनी खासगी दवाखान्यांमध्ये दाखवले असता त्याला जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक पेशंटची अगोदर कोरोना चाचणी घेण्याची तरतूद आहे. मात्र ही तरतूद पालन करता, त्या व्यक्तीला कोरोणा आहे की नाही ? हे न पाहताच चक्क कोरोना वॉर्डात ऍडमिट करण्यात आले.
तब्बल एक दिवस आणि एक रात्र हा रुग्ण दवाखान्यात राहिल्यानंतर ही बाब आम्हाला माहीत झाली. आम्ही त्या रुग्णाची कोरोणा चाचणी करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली. रुग्णालय प्रशासन यानंतर खडबडून जागे झाले आणि त्या रुग्णांची तपासणी केली असता तो रुग्ण पूर्ण निगेटिव्ह असल्याचे समोर आले. हा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर दवाखान्यातून चक्क बारा तासानंतर त्या रुग्णाला डिस्चार्ज दिला.
जिल्ह्या रुग्णालयात कोरोणा पॉझिटिव रुग्ण ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली असताना जर अशाप्रकारे ” दिसला माणूस की घाल वॉर्डात ” असे तत्व जर जिल्हा रुग्णालयानी अवलंबले असेल तर ते जनजीवन विस्कळीत करण्यासाठी कारणीभूत ठरेल. रुग्ण आणि नातेवाईकांना ही बाब त्रासदायक ठरेल.
कोरोना नसताना या व्यक्तीला करून कोरोना वॉर्डात ठेवलेच कसे ? या प्रश्नाचे उत्तर जिल्हा शल्य चिकित्सक अजूनही देऊ शकले नाहीत. त्याच्या उत्तराची वाट आणखी एक दिवस पाहून याबाबतची आम्हाला शासनाकडे तक्रार करावी लागेल. जनतेच्या मागण्या मांडत असताना त्या कडे लक्ष दिले गेले नाही, तर जिल्हा रुग्णालयाला त्रासदायक ठरेल.
आणखी किती लोकांना कोरोणा बाबतची चाचणी न करताच दवाखान्यात ऍडमिट करून घेतले आहे, अशा गंभीर बाबीला कोण जबाबदार आहे, याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयाकडे आपण मागितली आहे. त्याच प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत आपण स्वतः तपासणी करू, असे आश्वासनही दिले आहे. एकूणच कोरोना महामारीच्या काळामध्ये जिल्हा रुग्णालयाने आणि रुग्णालय प्रशासनाने रुग्नसेवा चांगल्या प्रकारे करावी. गंभीर चुका करू नयेत अन्यथा तेथील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करून आम्हाला आंदोलन करावे लागेल. असेही अँड. देशमुख यांनी दिलेल्या इशाऱ्याची म्हटले आहे.
त्याच प्रमाणे चांगली रुग्ण सेवा करणारे डॉक्टर, नर्स, ब्रदर, अन्य स्टाफ यांचे आभार मानण्यात आले आहेत. कोणी चुकले म्हणून त्याचे खापर सर्वांवर आम्ही फोडणार नाही. चांगल्या लोकांमुळे दवाखाना आणि रुग्ण हे नातं अधिक घट्ट होत आहे. त्यांचेही आम्ही ऋणी आहोत, असरही अँड. अजित देशमुख यांनी म्हंटले आहे.
——-
चौकट
———
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना आम्ही हा मुद्दा सांगितल्यानंतर त्यांनी काही वेळात काल दवाखाना गाठला. तेथील लोकांना तंबी दिली. वास्तविक पाहता त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्स वर खूप वेळ बैठक असतानाही त्यांनी वेळ काढला. त्यांनी कोरोना काळात असेच दक्ष राहावे. तर दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गीते यांना या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे हेच कळेनायं. दवाखान्यात रुग्णांचे हाल होत नाहीत ते काही चांगल्या डॉक्टर आणि स्टाफ मुळे होत नाहीत. अन्यथा बांधावरून शेळ्या हाकणाऱ्यांच्या हातात रुग्ण असते तर परिस्थिती बिकट झाली असती. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जायचे काम नाही. जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत. आम्हीही सातत्याने लक्ष ठेऊन आहोत, असेही अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.
————