कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : राज्यात कोरोना वाढत असल्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा या पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर आज घेण्यात आला. कोरोना परिस्थितीचा अंदाज घेवून जून व मे महिन्यात या परीक्षा होतील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून दहावी-बारावी परीक्षा होतील की नाही असे अनेक तर्क-वितर्क काढण्यात येत होते. परंतु आज मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये दहावी -बारावीच्या परीक्षा सध्या घेणे उचित ठरणार नाही म्हणून त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. लवकरच दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून या परीक्षा मे व जून महिन्यात घेण्यात येतील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.