बीड: वक्फ संस्थांच्या संपत्तीचे ऑनलाईन नोंदणीकरण उमेद पोर्टलवर सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून या पोर्टलला गंभीर तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. यामुळे वक्फ संपत्ती अपलोडसाठी अंतिम तारीख वाढवावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांची भेट घेत पत्राद्वारे केली आहे.
खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांची त्यांच्या कार्यालयात जात भेट घेतली. यावेळी वक्फ संपत्ती अपलोडच्या संदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा देखील केली. यावेळी रिजिजू यांना रितसर पत्रही दिले असून पत्रात म्हटले आहे, वक्फ संपत्ती अपलोडसाठी लॉग-इन आणि क्रॅश सारख्या समस्येमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हजारो नोंदी प्रलंबित राहत आहेत.देशभरात अद्याप फक्त ४५,११६ वक्फ संपत्तींचेच अपलोडिंग पूर्ण झाले आहे, मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड व मेपिंग तपासणीत अडकून आहेत, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रात हजारो नोंदींचे अपलोडिंग प्रलंबित आहे, पोर्टल रात्रीच्या वेळेत काही मिनिटेच कार्यरत राहते आणि नंतर लगेच क्रॅश होते, अशी तक्रारही अनेक संस्थांनी केली आहे, सध्याची अंतिम मुदत ५ डिसेंबर २०२५ इतकी आहे. मात्र अशा तांत्रिक बिघाडांत पूर्ण प्रक्रिया करणे अशक्य असल्याचे खा.बजरंग सोनवणे यांनी सांगितले. वेळमर्यादा न वाढवल्यास अनेक वक्फ संस्थांचे महत्त्वाचे रेकॉर्ड प्रलंबितच राहतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. बीड जिल्ह्यासह राज्यातून वक्फ संस्थांच्या संपत्तीचे ऑनलाईन नोंदणीकरण उमेद पोर्टलवर सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून या पोर्टलला गंभीर तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणीचे काम ठप्प झाले असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. याबाबतीत खा.बजरंग सोनवणे यांनी तातडीने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत हा महत्वाचा विषय मांडला. बीडसह महाराष्ट्र आणि देशभरात ही समस्या असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांना सांगीतले. यावर योग्य ती कार्यवाही करू, अशा शब्दात केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सकारात्मकता दाखविली.