लोहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी देशात आणि राज्यात लोककल्याणाच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. दिल्लीपासुन गल्लीपर्यंत विकास पोहोंचवायचा असेल तर नगरपरिषद निवडणुकीत कमळाला साथ द्या, एकही सामान्य माणुस विकासापासुन वंचित राहणार नाही असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी केले.
लोहा व कंधार नगरपरिषद निवडणूकीतील भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सुर्यवंशी व गंगाप्रसाद यन्नावार तसेच अन्य नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. माजी मुख्यमंञी खा.अशोक चव्हाण, खा. अजित गोपछडे, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, संघटन मंञी संजय कौडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
देशात नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश संपादन केले आहे. अनेक राज्यामध्ये आज भाजपाची सत्ता आहे आणि त्याठिकाणी विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंञी फडणवीस यांनी शेतकरी, शेतमजुर व जनसामान्यांच्या विकासासाठी जे काम केले आहे ते आतापर्यंत कोणीच केले नव्हते. राज्यात महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करुन लाडकी बहीण योजना अत्यंत यशस्वी ठरली आहे. लाडक्या बहिणींचे देवाभाऊंना कायम आशीर्वाद राहिलेले आहेत. तळागाळापर्यंत विकास पोहोंचवायचा असेल तर दिल्लीपासुन गल्लीपर्यंत फक्त कमळ आणि कमळाचीच सत्ता आली पाहिजे यासाठी लोहा आणि कंधार नगरपरिषद निवडणूकीतील नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करा असे आवाहन ना.पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले.