भिमाच्या लेकीसाठी मिमचे बंदे तगडबंद
बीड प्रतिनिधी ः- बीडच्या नगर परिषदेमध्ये सर्वच पक्षाचे उमेदवार अराजकीय आहेत वगळून तुतारी. राष्ट्रवादी पक्षाने नायब तहसिलदार म्हणून निवृत्त झालेल्या दलितमित्र मनोहर वंजारे यांच्या कन्या प्रेमलता पारवे यांना शेवटच्या घटकात घडी दिली. मुस्लिमांनी ज्या तुतारीला लोकसभेत, विधानसभेत गुलाल दिला त्या तुतारीने नगर परिषदेच्या निवडणुकीत मुस्लिमांच्या हातावर मात्र तुरी दिल्या. मुजीबच्या रुपात पारवे यांची उमेदवारी देण्याची कबुली आजी-माजी आमदारांनी दिलेली असताना एैन वेशीत मुजीबच्या माथी नकार मारला. मात्र याचवेळी मुस्लिम नेत्यांनी त्यांच्या नेत्याकडे म्हणजे अजित पवार यांच्याकडे मुजीब यांचा प्रस्ताव सरकवला. राष्ट्रवादीने फारसा विचार न करता अल्पसंख्यांक समाज एकगठ्ठ्याने एका भिमाच्या लेकीसोबत राहणार असेल तर विजयाचे सोपे समीकरण शक्य आहे, म्हणूनच पारवे यांची उमेदवारी निश्चित झाली. आज त्या प्रेमलता पारवे यांच्यात आपण आपली आई पाहतो असे भावनिक उद्गार मुजीब यांनी केले आणि आंबेडकरी चळवळीत मुजीब यांच्या वक्तव्याचे स्वागतही झाले. मुस्लिम एकवटले असले तरी ते काय मुस्लिम उमेदवाराला खुर्चीत बसविण्यासाठी नाही तर मुजीब यांनी आईचा दर्जा दिलेल्या भिमाच्या लेकीसाठी रणांगणात उतरले आहेत.
बीड नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवेसना-शिवसंग्राम मित्र पक्षाचे उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्या प्रचारार्थ त्यांचे जावई संपादक शेख मुजीब यांनी मुस्लिम बहुल भागात विविध प्रभागात भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. शेख मुजीब यांनी मतदारांशी संवाद साधताना भावनिक होऊन आशिर्वाद मागितले. प्रेमलता पारवे या जरी माझ्या सासू असल्या तरी मी त्यांच्यात आई पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या भिमाच्या लेकीला उमेदवारी जाहिर करून आंबेडकरी विचाराला चालना दिली आहे. आई समान असलेल्या प्रेमलता पारवे यांच्या विजयासाठी माझा मुस्लिम बांधव एकगठ्ठा माझ्या पाठिशी आहे आणि त्याबळावरच विजय निश्चित आहे असेही शेख मुजीब म्हणाले.
दरम्यान शेख मुजीब यांच्या वक्तव्याचे दलित आणि मुस्लिम समाजात स्वागत झाले असून दलित मतदारांसोबतच मुस्लिम मतदारही एकवटले आहेत. विरोधक कितीही आरोप करत असले तरी श्रीमती प्रेमलता पारवे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी कोणीही रोखू शकत नाही. आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी आ. संजय दौंड, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, शिवसंग्रामच्या डॉ.ज्योतीताई मेटे, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, माजी नगरसेवक दिलीप गोरे, शेख निजाम, बळीराम गवते, फारुक पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-शिवसंग्राम-सपा पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी श्रीमती प्रेमलता पारवे आणि सर्व 52 उमेदवारांच्या प्रचारासाठी मुठ बांधली असून बीड शहरात त्यांच्या पॅनलचे पारडे जड झाले आहे. प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर होत असून गेल्या अनेक वर्षांपासूनचा विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी या निवडणुकीत परिवर्तन होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.