बीड प्रतिनिधी ः- बीड नगर परिषदेवर ३५ वर्षे राज्य कारभार केला, परंतु शहरातील नागरीकांचे मुलभूत प्रश्न त्यांना सोडवता आले नाही. इथला पाणी प्रश्न गंभीर आहे, रस्ते, नाल्या नाही, अनेक प्रश्न भिजत पडलेले आहेत. विरोधकांनी हुकूमशाही पध्दतीने सत्ता केली. मुस्लिम समाजाने ३५ वर्षे त्यांना साथ दिली पण एैन मोक्याला आज ते तुम्हाला वाऱ्यावर सोडून गेले आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष विधारधारेवर चालणारा पक्ष आहे. पक्षाचे नेते आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आपल्यालाल शब्द दिला आहे, तो शब्द पूर्ण करण्यासाठी आपण सहकार्य करा आपल्या सर्वांच्या साथीने आणि सहकार्याने विरोधकांची मक्तेदारी मोडून टाकू आणि बीड शहरात ना. अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा उदय करू असे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. बीड शहरातील विविध प्रभागातील कॉर्नर सभेत मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शिवसेना – शिवसंग्राम – स.पा. आदी मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह प्रभाग क्र. २ मधील उमेदवार सौ. दिपालीताई किशोर धोत्रे, राहुल मधुकर शिनगारे तसेच प्रभाग क्र.१५ मधील डॉ.सुनिता प्रकाश काळे, पांडव अजिंक्य राजेंद्र, प्रभाग क्र. १ मधील धनंजय बाळासाहेब काळे आणि प्रभाग क्र.११ मधील शेख फरहत बेगम नसीर आणि शेख मोहम्मद खालेद यांच्या प्रचारार्थ आ. विजयसिंह पंडित यांच्यवा कॉर्नर सभा झाल्या. या कॉर्नर सभेला मतदारांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती ज्योती मेटे, माजीनगरसेवक दिलीप गोरे, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, बळीराम गवते, रात्नाकर काळे, अनिल घुमरे, निखील सवई, सुहास पाटील, भास्कर जाधव, शेख मुजीबभाई, भागवत तावरे, काझी रऊफ, काझी युसूफ, काझी नवाब यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()

















