सर्वांनी ताकतीने कामाला लागा – सर्जेराव तांदळे
जिल्हा कार्यालयात नियोजन बैठक संपन्न..
Beed : ना. पंकजाताई मुंडे, माजी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे त्यांच्या आदेशावरून आज भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, ॲड. सर्जेराव तात्या तांदळे, श्री. नवनाथ आण्णा शिराळे, शहराध्यक्ष श्री. अशोक लोढा, नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. ज्योतीताई घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषद निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली.
सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी डोअर टू डोअर फिरून सरकारची जनसामान्य लोकांसाठी राबवलेली विकास कामे, बीड नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता, लाईट, पाणी, पार्किंग, महिला सुविधा, आदीसह सबका साथ, सबका विकास हे मा. नरेंद्रजी मोदींचे स्वप्न हाती घेऊन, बीड नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी सर्वांनी ताकतीने काम करावे असे आवाहन करण्यात आले..
यावेळी प्रा. देविदास नागरगोजे, गणेशजी लांडे, पालसिंगणकर काका, डॉक्टर अभय वनवे, शांतिनाथ डोरले, सलीमजी जहागीर, अनिल चांदणे, चंद्रकांत फड, भूषण पवार, विलास बामणे, ज्योतिबा ननवरे, नूरलाला, बालाजी पवार, गणेश पुजारी, दत्ता परळकर, थिगळे साहेब,अमोल वडतीले, राजू शहाणे, सलीम अत्तर, महादेव नागरगोजे, हरीश खाडे, भालचंद्र कुलकर्णी, केशव बडे, मीराताई गांधी, जयश्रीताई मुंडे, संगीताताई धसे, शितलताई राजपूत, प्रीतताई कुकडेजा, संध्याताई मिश्रा, शैलजाताई मुसळे, लताताई मस्के, स्नेहाताई, माळी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
















