Beed : बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती की, तक्रारदार अण्णासाहेब गोटीराम राठोड यांचा मुलगा विदेशात शिक्षणासाठी राहत असून, त्याच्या येण्या-जाण्यासाठी विमानाची तिकिटे स्वस्तात मिळवून देतो अशी खात्री देत आरोपी कुणाल भाऊसाहेब चव्हाणके, वय 29 वर्ष, रा. चासनळी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर याने तक्रारदाराची तब्बल ₹२५,००,००० इतकी फसवणूक केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हा फरार होता आणि बराच काळ सापडत नव्हता. बीड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपास सुरू करून, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध लावून आरोपीला लोणावळा जिल्हा पुणे ग्रामीण येथून ताब्यात घेवून अटक करण्यात यश मिळवले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, गहिनाथ बावनकर, राम पवार यांचा विशेष सहभाग होता.
पोलीसांचे सर्वसामान्य नागरिकांनी आवाहन
“स्वस्तात विमानाची तिकीट मिळेल”, “परदेशात नोकरी लावून देतो”, “मोठा माल स्वस्तात देतो” अशा कोणत्याही आमिषावर विश्वास ठेवू नये.मोठी रक्कम देताना खात्री करूनच व्यवहार करावा.फसवणूक संशयित वाटल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.

















