अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची(AHTU) कारवाईत, पिडीत महिलेची सुटका,
वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेवर पोस्टे शिवाजी नगर मधे गुन्हा दाखल
Beed : याविषयी सविस्तर बातमी अशी की, अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना दिनांक १९/११/२०२५ रोजी दुपारी गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , पोलीस ठाणे शिवाजी नगर हद्दीत, धानोरा रोड परिसर येथे राहत्या घरामध्ये बाहेरील महिलांना बोलावून, वेश्या व्यवसाय करीत आहेत. ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावरून वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना AHTU सोबत सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यावरून PI उमाशंकर कस्तुरे व अ. मा. वा. प्र. कक्षाच्या प्रमुख PSI पल्लवी जाधव या त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक व पंचासह सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या महिललेने एजंटला वेश्या गमनासाठी होकार देवून त्यासाठी १००० रुपयांची मागणी केली. डमी ग्राहकाने ठरल्या प्रमाणे रक्कम देवून पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता, पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. पैसे स्वीकारलेल्या महिलेला तिचे नाव गाव विचारले असता, तिने तिचे नाव सीताबाई नारायण दहे (वय ७० वर्षे रा. भगवान विद्यालया समोर, धानोरा रोड ता.जि बीड) असे सांगितले. सदर महिलेची पंचासमक्ष झडती घेतली असता, डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या ५०० रू. दराच्या २ नोटा मिळून आल्याने त्या पंचासमक्ष जप्त केल्या. सदर ठिकाणी एक पीडित महिला मिळून आली. पीडीत महिलेला विश्वासात घेवून चौकशी केली असता , तीने सांगितले की, सीताबाई नारायण दहे या, पीडीत महिलांना बोलवून घेतात व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेवून, पीडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले. तसेच रुमची झडती घेतली असता २४ विना वापरलेले निरोध मिळून आले आहे. नमुद आरोपी महिलेवर, पीडीत महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन, स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करुन त्याच कमाईवर उदरनिर्वाह करुन वेश्याव्यवसाय करण्यास लावले व सदर महिलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावले म्हणून त्यांच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३,४,५,६ ,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे प्रभारी पोलीस उपअधीक्षक मुख्यालय , पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव , महीला पोलीस हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे , पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोलीस शिपाई योगेश निर्धार सर्व नेमणूक अ. मा. वा. प्र. कक्ष यांनी केली.

















