न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार–आ. विजयसिंह पंडित
बंजारा समाजाच्या मी कायम सोबत— अमरसिंह पंडित
=================
गेवराई प्रतिनिधी : मराठवाड्यातील बंजारा समाजास हैद्राबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्याबाबत बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज आ. विजयसिंह पंडित यांना निवेदन दिले. बंजारा समाजाच्या मागणीला आ. विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दिला असून बंजारा समाजाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा असून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देऊन बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे
आ. विजयसिंह पंडित म्हणाले तर बंजारा समाजाच्या मागणीसाठी आपण कायम बंजारा समाजाच्या सोबत असल्याचे माजी आमदार अमरसिंह पंडित यावेळी म्हणाले.
बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बंजारा समाजाची हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी आमदार विजयसिंह पंडित यांना निवेदन दिले. यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार अमरसिंह पंडित, सुंदरसिंग महाराज, विक्री संघ उपसभापती गणपत राठोड, माजी पं.स.सदस्य रोहिदास चव्हाण, उपसरपंच सुनील जाधव, माजी उपसंचालक रामेश्वर पवार यांच्यासह बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कृष्णाई येथे बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, मायबाप बंजारा समाजाने मला कायदेमंडळात पाठवले आहे, त्यामुळे मी बंजारा समाजाला कधीही वा-यावर सोडणार नाही. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला, त्याचा फायदा बंजारा समाजाला मिळणार आहे.
बंजारा समाजाचे उपकार शिवछत्र परिवारावर आहेत, त्यांच्यातून ऋणातून कधीही उतराई होऊ शकत नाही. गेवराई तालुका सर्व जातीधर्माच्या घेऊन चालणारा आहे. सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न शिवछत्र परिवाराचा आहे. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने आपण विधीमंडळात हा प्रश्न मांडू. पहिला आमदार म्हणून बंजारा समाजाला आपला पाठींबा देत असल्याचे ते म्हणाले. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत आपण निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*बंजारा समाजाच्या मी कायम सोबत— अमरसिंह पंडित*
==============
प्रसंगी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, मी कायम बंजारा समाजा सोबत आहे. बंजारा समाजाला सुद्धा एसटीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. मी विश्वास देतो. परभणी विद्यापीठाला नाव देण्यासाठी अगदी टोकाला जाऊन आपण काम केले, सभागृहात बंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला केले. आज इथून बंजारा आरक्षणाची मशाल पेटली आहे. शिवछत्र परिवार बंजारा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आदीवेशनात बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार. फक्त तुम्ही आवाज द्या तुमच्या बरोबर हा शिवछत्र परिवार आहे. आ. विजयसिंह पंडित यांच्या विजयात तुमचा मोठा वाटा आहे. शिवछत्र परिवार ताकदीने तुमच्या बरोबर आहे असेही ते म्हणाले.