बीड नगरपालिकेचे नविन सीओ शैलेश फडसे
प्रारंभ वृत्तसेवा
Beed : बीड नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून भ्रष्टाचाराचे आरोप नीता अंधारे यांच्यावर होत होते, यामुळे साहजिकच त्यांची बदली होणार हे निश्चित होते. आज त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नांदेड जिल्ह्यात कार्यरत असणारे शैलेश फडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नांदेड येथून कार्यमुक्त करण्यात आले असून बीडचा कारभार तात्काळ घेण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत..