दिंद्रुड पोलिसांची कारवाई; सोशल मिडियावर फोटो टाकणे आले अंगलट
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गावामध्ये आपला दरारा कायम राहावा, आपलं वजन रहावे यासह इतर कारणासाठी ठीक ठिकाणी वेगवेगळे ट्रेंड चालवले जात आहेत, यातच आता अनेक जण तलवारीने केक कापून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसतात. असाच काहीसा प्रकार दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत घडला होता, याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. याची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंद करत तीन तलवारी जप्त केल्या. या कारवाईमुळे भविष्यात जिल्ह्यामध्ये अशा घटनांना नक्कीच आळा बसेल.
दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत मौजे उमरी, ता. माजलगाव येथील अनिल जनार्धन शिंदे याचा वादिवस होता. सदर वाढदिवसानिमित्त उमरी गावात मित्रंडळीसह रात्रीच्या वेळी डीजेवर नाचण्यासह तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर वाढदिवस कार्यक्रमास अनिल शिंदे याचे काही मित्र उपस्थित होते. आपले गावातील व परीसरातील वजन दाखविण्यासाठी वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्यात आला. सदर कार्यक्रमाचे फोटो काढण्यात आले तसेच सदरचे फोटो सुनिल जनार्धन शिंदेच्या भावाने फेसबुकवर अपलोड केले होते. याची माहिती दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर फोटोबाबत माहिती मिळविली असता सदरचा वाढदिवस हा पोलीस ठाणे हदीत 15/07/2025 रोजी रात्री २.३० च्या समारास पार पडला असल्याचे समजले. तसेच सदर फोटोमध्ये तीन तलवारीव्दारे केक कापणाऱ्या चार व्यक्ती नामे१) अनिल जनार्धन शिंदे वय २४वर्षे, २) महादेव प्रताप प्ररिदे,वय २२ वर्ष दोन्हीरा उमरी ता. माजलगाव, २) विशाल गवळी, रा. पिपळगाव (नाखला), ता. त माजलगाव, ४) दादा म्हस्के, रा पात्रुड, ता. माजलगाव असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तलवारीने केक कापल्याबाबतचे सदर वाढदिवसाचे फोटो दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अनिल शिंदेचा भाऊ सनिल जनार्धन शिंदे, रा. उमरी, ता. माजलगाव यानेत्याच्या फेसबुक या सोशल मिडीयावर शेअर केले. म्हणृन वरील पाचही जनांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या एकुण ०३ तलवारी जप्त करण्यात आल्या. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नवनित काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधिक्षक निरज राजगुरु यांच्या मर्गदर्शनाखाली महादेव’ ढाकणे, पोउपनि. संजयकुमार राठोड, निंदकुमार वाघमारे, युवराज श्री डोळे, कैलास पोटे यांनी केली.