बीड प्रतिनिधी : पुणे येथे पार पडलेल्या शिवसंग्रामच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी राज्यस्तरीय सदस्य नोंदणी अभियानाची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यामध्ये १ मे ३० मे या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे. काल दि. २ मे रोजी बीड जिल्हा शिवसंग्रामच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत या सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली. यास उदंड प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यासाठी दिलेले सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला.
लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम ‘संघटन सर्वोपरि ‘ या विचारधारेने कार्य करणाऱ्या संघटनेत लोकशाही असून सामुहिक निर्णय आणि परस्पर संवाद ही दोन वैशिष्ट्ये आहेत. संघटनशक्तीला बळ देण्यासाठी पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी झोकून देऊन काम करत असल्याबद्दल शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी कौतुक केले. या अभियानासाठी पक्ष संघटना, कार्यकर्ते काम करत आहेत. पुढील महिनाभर हे अभियान राबवणार आहेत. जिल्ह्यात जवळपास ५० हजार सदस्य बनवणार आहेत. या अभियानात युवा, लाडक्या बहिणी, बौध्द समाजात सर्वच समाजाने सहयोग घेतला आहे. असा कोणताही समाज नाही ज्याने शिवसंग्रामने सदस्यता घेतली नाही. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजतील लोकांनी सहभाग घेतला आहे, याप्रसंगी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष प्रा सुभाष जाधव, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे पाटील, शहराध्यक्ष सुहास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंडितराव माने, सचिन काळकुटे, खरेदी विक्री संघाचे संचालक गोपीनाथ घुमरे, मजूर सहकारी संस्थेचे संचालक बाळासाहेब हावळे , रामदास नाईकवाडे, ज्ञानेश्वर कोकाटे, मनोज जाधव ,सुनील शिंदे ,शेख कुतुब भाई, शेख आबेद, संगीता ठोसर, शेषेराव तांबे, सुशील कांबळे, कैलास शेजाळ, विठ्ठलराव ढोकणे, राजेंद्र आमटे , अशोक लोकरे, रायचंद कापसे, देविदास मेंगडे , धर्मराज मागदे, पंडित शेंडगे ,हरीचंद्र ठोसर, गणेश धोंडरे,संदीप नवले, ओकार पाटील, आदी उपस्थित होते.