ईटकुर जोड रस्त्यावरील १५८ लक्ष रुपयांच्या पुल बांधकामाचा शुभारंभ
गेवराई प्रतिनिधी ः- तालुक्यातील रामा ५२ ते ईटकुर – शिंपेगाव – लोळदगाव रस्त्यावरील साखळी क्र. १ / ९१० वरील १५८.१३ लक्ष रुपयांच्या पुल बांधकामाचा शुभारंभ नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज व जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असून दळणवळणाची साधने निर्माण झाल्यास या भागाचा विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी केले. विकासाची दृष्टी अमरसिंह पंडित यांच्याकडे असल्यामुळे तेच या भागाचा विकास करू शकतील असे प्रतिपादन यावेळी ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी केले. व्यासपीठावर शिंपेगाव येथील दत्त संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. हनुमान महाराज गिरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ईटकुर येथील अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.
गेवराई विधानसभा मतदार संघात अतिशय दर्जेदार विकासकामे सुरु आहेत. आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ५२ ते ईटकुर – शिंपेगाव – लोळदगाव रस्त्यावरील साखळी क्र. १ / ९१० वर १५८.१३ लक्ष रुपये किंमतीच्या पुल बांधकामाचा शुभारंभ बुधवार, दि.२३ एप्रिल रोजी करण्यात आला. यावेळी नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, दत्त संस्थान, शिंपेगावचे मठाधिपती ह.भ.प. हनुमान महाराज गिरी, ह.भ.प. धुराजी बाबा, ह.भ.प. करांडे महाराज, मादळमोहीचे सरपंच राजेंद्र वारंगे, आहेरचिंचोलीचे सरपंच विकास रकटे, माजी पं.स.सदस्य जयसिंग जाधव, दत्ता भोजगुडे, माजी सरपंच अरुण वाघमारे, उपअभियंता पोपटराव जोगदंड, नितीन विर यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ईटकुर येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी सुसंवाद केला, यावेळी त्यांनी ह.भ.प. शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले.
ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सक्षम केल्यानंतर या भागातील विकास होऊ शकेल म्हणून जाणीवपूर्वक ग्रामीण रस्ते दर्जेदार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग ५२ पासून ईटकुर, शिंपेगाव व लोळदगाव पर्यंत रस्त्याचे काम मंजुर असले तरी भविष्यात हा रस्ता सिरसमार्ग पर्यंत जोडला जाईल त्याचबरोबर कामे दर्जेदार होतील असे प्रतिपादन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी यावेळी केले. पंडित परिवार सातत्याने समाजाच्या सेवेत आहे, सरकार दरबारी प्रयत्न करून विकासाची कामे अमरसिंह पंडित यांच्यासारखे नेते करू शकतात, या भागातील सर्व विकासकामे त्यांच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.शिवाजी महाराज यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधीर गाडे यांनी केले तर आभार प्राचार्य अर्जुन मासाळ यांनी मानले.
यावेळी सरपंच पांडुरंग शिंदे, सरपंच विष्णू पिसाळ, अतुल नलावडे, सुभाष एरंडे, सखाराम जाधव, सरपंच बंडू परदेशी, वैजिनाथ मासाळ, त्रिंबक ढेंगळे, वसंत ढेंगळे, चेअरमन चंद्रकांत जाहेर, माणिक मासाळ, श्रीराम मासाळ, सतिष देवकते, भागवत ढेंगळे, सुनिल ढेंगळे, मच्छिंद्र वडमारे, सतिष ढेंगळे, सिध्देश्वर जाहेर, गणेश ढेंगळे, गणेश जाहेर, अमोल लोखंडे, शहादेव ढेंगळे, अशोक ढेंगळे, पांडुरंग सिराम, संतोष सिराम, हनुमान ढेंगळे, बंडू जाहेर, विनायक मासाळ, बाबासाहेब मासाळ, मधुकर ढेंगळे, माणिकराव मासाळ यांच्यासह ईटकुर, शिंपेगाव, लोळदगाव, शहाजानपूर आदी भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.