दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशात खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्याच्या हिताचे अनेक मुद्दे मांडले आहेत. यातच जिल्हा नियोजन समितीत होत असलेल्या पक्षपातीपणाबद्दलही त्यांनी आवाज उठविला. ते म्हणाले, बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात जिल्ह्याचे खासदार यांच्या शिफारसींना पूर्णत: दुर्लक्षित करण्यात येत आहे. सर्व लोकप्रतिनिधींना समान निधी मिळावा ही जबाबदारी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी यांची असते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सुद्धा नियोजन समितीच्या कामांसाठी प्रस्ताव सादर करताना खासदारांनी सुचविलेल्या कामांकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात खासदारांची जाणीवपूर्वक उपेक्षा करणाऱ्या जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध शासन कोणती कार्यवाही करणार आहे तसेच सन २०२५-२६ च्या नियोजनामध्ये हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी, व खासदारांनी सुचविलेल्या कामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कोणते पावले उचलणार आहे ? असा सवाल उपस्थित करत, आगामी जिल्हा नियोजन समितीत कामे मंजूर करत असताना खासदारांच्या शिफारसीतील कामे असतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.