एमआयडीसी, महामार्ग प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयात
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- बीडच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर आ.संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी (दि.१४) एमआयडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयात बैठका घेतल्या. यावेळी बीड येथील एमआयडीसीचा विकास आणि बीडच्या बायपासवरील स्लीप सर्व्हिस रोड व उड्डाणपूलांच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास होण्यासाठी नवनवीन उद्योग बीडमध्ये यावे लागतील. त्यामुळे सर्वप्रथम बीड शहरात असलेल्या एमआयडीसीचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन आ.संदीप क्षीरसागर यांचा, बीडच्या एमआयडीसीच्या विकासाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. गेल्या आठवड्यातच आ.क्षीरसागर यांनी बीड येथील शासकीय विश्रामगृहात औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेतली होती. यानंतर आता पुन्हा छत्रपती संभाजी नगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयात आ.क्षीयसागर यांनी याच विषयावर बैठकप घेऊन एमआयडीच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. यासोबतच बीडच्या बाह्यवळण रस्ता म्हणजेच बायपासवर उड्डाणपूल नसल्यामुळे नियमितपणे अपघात होत होते. तसेच स्लीप सर्व्हिस रोड नसल्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. याबाबतही आ.संदीप क्षीरसागरांनी शासन, प्रशासन आणि न्यायालयात पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. आता बीडच्या बायपासवर महालक्ष्मी चौक, जिरेवाडी व छत्रपती संभाजी महाराज चौक, समनापूर या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आणि परळी रोड, नाथापूर रोड, इमामपूर रोड या ठिकाणांवर स्लीप सर्व्हिस रोडच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. याबाबतचा आढावाही आ.संदीप क्षीरसागर बैठकीत घेतला. संभाजीनगर येथे झालेल्या एमआयडीसीच्या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, प्रकल्प संचालक श्री.रवींद्र इंगोले यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.