आ.संदीप क्षीरसागर सामान्य जनतेच्या मनातील आमदार – राजेंद्र मस्के
बेलखंडी- नागझरी – नामाजीबुवा डांबरी रस्ता कामाचे उद्घाटन संपन्न ..!
बीड प्रतिनिधी : मसाजोग येथील घटना अत्यंत क्रुर व निंदनीय घडली. जातिपातीचा विषय नसून माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना, असा अन्याय कोणावरही होऊ नये. सामान्य जनतेवर होणारा अन्याय, अत्याचार खपवून घेणार नाही. असा इशारा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे.
लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बेलखंडी फाटा, नागझरी ते नामाजी बुवा या सहा किलोमीटर डांबरी रस्ता कामाचे उद्घाटन मोजे बेलखंडी येथे आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, शेतकरी मित्र राजेंद्र मस्के यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून संपन्न झाले. पुढे बोलताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले, कठीण परिस्थितीत जनतेने मला साथ दिली. सामान्य मतदारांनी मतदानरुपी आशीर्वाद दिले. आयुष्यात मिळालेली ही साथ विसरणार नाही. लिंबागणेश गटातील मतदार बांधवांनी मताधिक्य देऊन माझ्या विजयात हातभार लावला. या परिसरातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. आपल्या हक्काचा निधी खेचून आणणार. विकास कामाला कायम मदत करणार. निवडणुका, विकासकामे असो अथवा अन्याय महाविकास आघाडी भविष्यात एकजुठीने लढा देणार व जनतेचे हित साध्य करणार. असा विश्वास दिला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्री परमेश्वर सातपुते जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा, श्री गणेश वरेकर शिवसेना जिल्हाप्रमुख उबाठा, श्री वैजनाथ नाना तांदळे राष्ट्रवादी, श्री गोरख सिंघन शिवसेना, बाळासाहेब गोरे राष्ट्रवादी, सरपंच सुभाष मस्के, संजय पवार कार्यकारी अभियंता जीप बीड, पोपटराव जोगदंड मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अनुरथ सानप गटविकास अधिकारी, ग्रामसेवक देशमाने, अक्षय शिंदे तलाठी, आरोग्य अधिकारी मर्कड साहेब उपस्थित होते.
*आ.संदीप क्षीरसागर सामान्य जनतेच्या मनातील आमदार – राजेंद्र मस्के*
बीड विधानसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या परिस्थितीत लढली गेली. धनशक्ती विरोधात जनशक्तीचा सामना झाला. पैशाचा पाऊस पडला. परंतु हुशार मतदारांनी आपल्या मनातील आमदार म्हणून संदीप क्षीरसागर यांना मत दिले. मागील पाच वर्ष नेतृत्वाशी एकनिष्ठ राहीले. पहाटची शपथ अथवा आलेल्या आमिषाला ठोकर मारली. म्हणूनच त्यांच्या एकनिष्ठेचे चीज झाले. या पाच वर्षात सामान्य जनतेनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आमदार संदीप क्षिरसागर यशस्वी ठरतील. आणि मतदार संघातील विकास कामांना गती देतील. असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला..
*बेलखंडी फाटा ते बेलखंडी गावकऱ्यांनी आमदारांची मिरवणूक काढून भव्य सत्कार केला. तसेच आमदार क्षीरसागर यांनी जि.प. शाळेला भेट देऊन परिसराची पाहणी केली.*
या उद्घाटन कार्यक्रमासाठी परिसरातील चंद्रसेन शेळके, महादेव नेहराळे, पांडुरंग कानडे, गुंडीबा देवडे, संदीप धुमाळ, सुभाष मस्के, किशोर शेळके, उद्धव जाधव, लालासाहेब पन्हाळे, रावसाहेब मस्के, बिभीषण मुळीक, अमोल माने, अशोक वाणी, सुभाष बहीरवाळ,बाळासाहेब गात, विलास काकडे, सुधाकर चव्हाण, शामराव तुपे, गणेश वाणी, आसेफ पठाण, शरद बहिरवारवाळ, राम बहीरवाळ, राहुल मुळे, शेषेराव बहिरवारवाळ, राकेश बिराजदार, श्याम कोठुळे जमील भाई, शफिक काजी, अश्विन शेळके पंकज धांडे, उद्धव जाधव सुग्रीव डोके, आबा येळवे, शरद बहिरवाळ, शरद बडगे, शामराव तुपे गुरुजी, कल्याणराव पवार, योगेश चव्हाण, यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
बेलखंडी ग्रामस्थांच्या वतीने महेश सावंत, अजय सावंत, संघर्ष माने, गोकुळ सावंत, अक्षय बजगुडे, दत्ता सावंत, अनिकेत भारती, अभिषेक भिंगले, जितेंद्र तुपे, सरपंच गुंडीबा देवडे, अशोक काळे, अनिल माने, आबासाहेब येळवे, बाबुराव पाहुणे, संपत मंडलिक, शिवाजी भिंगले, साहेबराव बजगुडे, सतीश वजगुडे, किशोर तुपे, श्रीमंत तुपे, नानाभाऊ भिंगले, सलाम शेख, मुनीर पठाण, जरजिस पठाण, पुरुषोत्तम कासारे, बंडू फाळके, भागवत सावंत, बाळू भिंगले, महादेव जाधव, दादा माने, बाळासाहेब माने यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.