जिल्ह्यातील कोरोना वाढत असल्यामुळे जिल्ह्यात जारी केली नविन नियमावली
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नविन आदेश काढत, जिल्ह्यात परत नवे नियम लागु केले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडत सर्व दुकाने बंद ठेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. 30 एप्रिल पर्यंत हा नियम लागु राहणार आहे.
जिल्ह्यात आज पासुन अत्यावश्यक सेवा सोडता सर्व दुकाने बंद करण्याचा नवा आदेश सोमवारी (ता. 05) संध्याकाळी जिल्हाधिकारी यांनी काढला. या निर्णयामुळे तब्बल 25 दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. पुर्वीचे दहा दिवस व आता परत 25 दिवस बंद म्हणटल्यावर दुकानदारांनी काय करायचे असा प्रश्न येथील दुकानदारांसमोर पडला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात असे आदेश जिल्हाधिकारी काढत आहेत.