मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नागरी सत्कार समितीकडून आवाहन
बीड प्रतिनिधी : बीड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचा भव्य नागरी सत्कार बीड येथे रविवारी (दि.१) रोजी होणार असून याप्रसंगी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार समिती बीड शहर यांच्याकडून करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत आमदार संदीप क्षीरसागर यांची तब्बल दुसर्यांदा आमदार पदी जनआशिर्वादाने निवडून आले आहेत. अनेक अडचणी, दबाव, संकटे यांना न जुमानता आ.क्षीरसागर आपल्या आणि पक्षांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले. याचेच बक्षीस म्हणून बीडच्या जनतेने आ.संदीप क्षीरसागरांना दुसर्यांदा विधानसभेत पाठवून प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. आ.संदीप क्षीरसागर दुसर्यांदा आमदार झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी बीड शहर नागरी सत्कार समितीच्या वतीने रविवारी (दि.१) रोजी बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे सकाळी ११ वा. भव्य नागरी सत्कारा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मायबाप मतदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन सत्कार समितीकडून करण्यात आले आहे.