एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी शिवसैनिकांकडून साकडे
बीड, प्रतिनिधी- नुकत्याचा पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयी यशाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्या मार्गर्शनाखाली बीडमध्ये शिवसैनिकांनी महायुतीचे अभिनंदन करत मोठ्या हर्षल्हासात आनंद सोहळा साजरा केला तसेच हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर मा. आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रभरात सर्व सामन्यांसाठी कल्याणकारी योजना राबवत यशाची पताका फडकावणारे शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी बीड शहरातील सोमेश्वर महादेव मंदिरात भावीक भक्तांच्या उपस्थितीत सामूहिक आरती करून जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या समर्थकांनी साकडे देखील घातले.
काल सोमवारी दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिकांनी एकत्रित येऊन महापुरुषांना अभिवादन केले. त्यानंतर हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फाटक्यांची आतषबाजी करत शिवसेनेचा जयघोष केला तसेच सर्वांनी मिठाई वाटून आनंदत्सव साजरा केला. मा.मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते व लाडके शिवसैनिक यांच्या कष्टातून विधानसभा निवडणुकीत आपणांस भरघोस यश मिळाले असल्याच्या भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. या निमित्ताने सायंकाळच्या दरम्यान शिवसैनिक तथा महिला भगिनींनी पणती व दिवे प्रज्वलीत केले तसेच विविध मंदिरात देखील शिवसैनिकांनी देवी देवतांच्या चरणी नतमस्तक होऊन आरत्या केल्या व शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शाम भाऊ पडूळे, शिवसेना जेष्ठ नेते सुरेश तात्या शेटे, महिला आघाडी जिल्हा सहसंपर्कप्रमुख डावकर ताई, शिवसेना जिल्हा संघटक सुनील सुरवसे, शिवसेना जिल्हा संघटक योगेश नवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजय जाधव, शिवसेना विधानसभा प्रमुख सुनील अनभुले, शिवसेना तालुका संघटक गणेश मस्के, सुदर्शनजी धांडे, सुनील गवते, गजानन कदम, शिवसेना शहर संघटक नवनाथ शिंदे, शिवसेना शहर सह संघटक ऋषिकेश जोगदंड, शिवसेना उप शहर प्रमुख हनुमानप्रसाद पांडे, शिवसेना उपशहर प्रमुख अक्षय काशीद, माजी सरपंच संदीपान बडगे, शिवसेना विभाग प्रमुख सदाशिव सुर्वे , शिवसेना विभाग प्रमुख शहर रणजीत बुंदिले, सरपंच अंकुश गायकवाड,अमोल मामा जाधव, उत्कर्ष धपाटे, गणेश काळे, अनिल खांडे, अविनाश पाटोळे,तुकाराम गोरे, गणेश डांगे, राहुल कोकाटे, अजय सुरवसे, प्रताप जगताप, गणेश काळे व आदी उपस्थित होते.
—–
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच असावेत- अनिलदादा जगताप
तळागाळातील माणसांची जान असणारे सर्व सामान्यांचे नेतृत्व म्हणून अवघ्या महाराष्ट्रभरातील जेष्ठ, तरुणाई, शेतकरी, कष्टकरी, महिला भगिनी यांच्यात आमचा सक्षम आधार अशी विश्वास निर्माण करणारे शिवसेना मुख्य नेते मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश प्राप्त केले असून आता शिंदे साहेबच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी सर्वोपरी योग्य चेहरा आहे व शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री बनावेत अशी भावना शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे व राज्याच्या विकासाठी शिंदे साहेबांच्याच हातात मुख्यमंत्री पदाची धुरा द्यावी अशी एक शिवसैनिक म्हणून महायुतीच्या जेष्ठ श्रेष्ठींना विनंती आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी आपली भावना व्यक्त केली.