बीड शहरासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना आ.क्षीरसागर यांना पाठींबा
बीड (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांना बीड शहरातील संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सनी चांदणे व सर्व बीड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दर्शवला. आपल्या सर्वांच्या पाठबळावर या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास या प्रसंगी आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला
यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, डेमोक्रॅटिक पार्टी इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यजी चांदणे व मान्यवर उपस्थित होते.आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, राजकीय आणि सामाजिक जीवनात वाटचाल करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षातील सर्व जेष्ठ अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन घेवून आपण कायम बीड मतदारसंघात विकासाच्या विविध योजना आणून जनतेची कामे केली. प्रलंबित विकासकामे सभागृहात मांडली, लोकहिताचे प्रकल्प पुर्ण व्हावेत म्हणून वारंवार पाठपुरावा केला. यातील बहुतांश कामांना मंजूरी आणली. भविष्यातही मतदारसंघाच्या विकासाचा आलेख आपल्याला उंचावत ठेवायचा आहे. आपल्याकडून सर्वांची कामे व्हावीत,अशी सरळ साधी विचारधारा आणि प्रत्येकाविषयी आपुलकीची भावना ठेवून मी व माझे सर्व सहकारी राजकीय व सामाजिक जीवनात काम करत आहोत. आपण हे जाणून आहात. मात्र आता निवडणूक लागली म्हणून आपले राजकीय विरोधक केवळ टिका करत आहेत.बीड मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी काम करताना ग्रामीण भागातील घरकुल असो की रस्ते, सभागृह,पिण्याच्या पाण्यासाठीची सिंचन व्यवस्था,शेतकरी,कष्टकर्यांचे प्रश्न याबाबत सातत्याने तुमचा प्रतिनिधी म्हणून आवाज उठवला. मतदारसंघाच्या हिताचे इतर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि आपल्या नेत्यांच्या विचारांचा अन् विकासाचा वसा,वारसा पुढे घेवून जाण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रत्येक मत माझ्यासाठी महत्वाचे आहे म्हणूनच येत्या बुधवारी (दि.20)‘तुतारी वाजवणारा माणूस’चिन्हासमोरील बटन दाबून मतदार संघाच्या विकासासाठी सेवेची संधी द्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.
बाजार समितीत व्यापारी, हमाल, मापाडी बांधवांशी साधला संवाद
आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी बीड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापारी, हमाल, मापडी बांधवांची भेट घेऊन येणाऱ्या २० तारखेला “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्ह समोरील बटन दाबून मतदानाचा हक्क बजावत मला विजयी करण्याचे आवाहन केले.