सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभणारे नाही
मांजरसुभा येथील सभेने बालाघाट परिसरात ज्योती मेटे लाट
बीड प्रतिनिधी : बीड मतदार संघातील मतदारांनी डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांनी निवडून देण्याचा निश्चय केला आहे. त्यांच्या सभांना होणारी गर्दी ही त्यांना विजया पर्यंत नेणारी आहे. एकमुखाने मतदार डॉ. ज्योती मेटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याने विरोधकांच्या पाय खालची वाळू सरकत आहे आणि समोरील विरोधक खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत आहेत बीड मधील काही विद्वान माझी जात काढतात हे दुर्दैव आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय आहे. असे मांजरसुंभा येथे पार पडलेल्या जाहीर सभे प्रसंगी डॉ. ज्योती मेटे यांनी म्हंटले आहे.
बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी बॅटरी टॉर्च निवडणूक चिन्ह घेऊन मतदार संघ पिंजून काढला आहे. जाहीर सभांचा त्यांनी सपाटा लावला असून मांजरसुभा येथे पार पडलेल्या जाहीर सभेला बालाघाट वरील जनतेने अलोट गर्दी केली होती. या सभेत त्या बोलत होत्या बीड विधानसभा निवडणूक येथील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि विकासाच्या मुद्द्यावर लढली जात नसून त्याला जातीय रंग देते खालच्या पातळीवर एका अभागी महिलेवर टीका करण्यापर्यंत गेली आहे. येथील नागरिकांचे सिंचनाचे प्रश्न, उद्योगधंदे, रोजगार असे अनेक समस्या असताना जनतेचे लक्ष विचलित करून टीका करणे एवढेच विरोधकांचे काम राहिले आहे. मात्र आपण या समस्येपासून कधीही दूर जाणार नाही हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे मत डॉ. ज्योती मेटे यांनी व्यक्त केले आहे.
या प्रसंगी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, प्रा. ए . आर. पाटील , शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद , जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, बीड विधानसभा प्रभारी सुभाष जाधव , सुनील शिंदे, श्रीराम घोडके, सचिन कळकुटे, कोकने ताई, गजानन चौधरी, अजिंक्य जगदाळे, बाळासाहेब रसाळ, संतोष ढवळे, गणेश मोरे, संजय चौरे, कृष्णा भागडे आदी उपस्थित होते.