मुंदडा परिवाराची पस्तीस वर्षांची साथ सोडून ज्ञानेश्वर चवरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
केज ! प्रतिनिधी
केज तालुक्यातील भांटुबा येथील रहिवासी तथा केज पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे यांनी मुंदडा परीवाराची तब्बल पस्तीस वर्षांपासूनची साथ सोडत जुने सहकारी खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. ऐन निवडणुकीत मुंदडा परिवारासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर पृथ्वीराज साठे यांना बळ मिळणार आहे.
केज पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर अण्णासाहेब चवरे हे तालुक्यातील चांगले राजकीय व्यक्तित्व असून मोठा जनसंपर्क असलेले ते नेते आहेत. प्रत्येक गावात त्यांचा असलेला संपर्क ही त्यांची खूप मोठी जमेची बाजू आहे. ज्ञानेश्वर चवरे यांनी पंचायत समिती सभापतीच्या काळात अतिशय चांगले काम केले होते. पंचायत समिती सभापती म्हणून संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला होता. मागील 35 वर्षाच्या काळात स्व. विमल मुंदडा यांच्यासोबत काम करताना प्रत्येक गावात आपल्या सोबत माणसे जोडलेली होती. मध्यंतरीच्या काळात नंदकिशोर मुंदडा यांच्यासोबत मतभेद झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून ज्ञानेश्वर चवरे हे नंदकिशोर मुंदडा यांच्यापासून दुरावले होते. सध्या विधानसभा निवडणुका चालू असताना त्यांचा प्रवेश मोठा राजकीय भूकंप मानला जात असून यामुळे नंदकिशोर मुंदडा यांना मोठा धक्का मानला जात आहे, तर पृथ्वीराज साठे यांचे बळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्ञानेश्वर चवरे यांनी आपण घेत असलेला निर्णय थोडा त्रासदायक नक्कीच आहे, परंतु खा. बजरंग सोनवणे हे माझे जुने सहकारी आहेत. आज ते मोठ्या पदावर असल्यामुळे मला आनंद आहे. राजकीय विरोध असला तरी कधीही आमचे मतभेद झाले नाहीत आणि आम्ही एकत्रित काम करत असल्यामुळे आता नक्कीच आनंद होत आहे. यावेळी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, ज्ञानेश्वर चवरे हे माझे जुने सहकारी आहेत व माझ्या परिवारातीलच आहेत. ते नक्कीच माझ्या भावाप्रमाणेच राहतील. यावेळी कल्याण शिंनगरे यांची आठवण काढली व जसे ते होते तसे आता ज्ञानेश्वर चवरे राहतील. यावेळी ज्ञानेश्वर चवरे, विलास चवरे, सुनिल धपाटे, पप्पू धपाटे, नाना मोरे यांच्यासहा अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला.