पेठेतील बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सवात आरती तर पाटांगणावरील जनी जनार्दन संस्थानच्या वार्षिक उत्सवाच्या सांगतेलाही उपस्थिती
संत-मंहतांचे दर्शन घेवून घेतले आशीर्वाद
बीड प्रतिनिधी : बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी निवडणूक प्रचाराच्या व्यस्ततेत असतानाही संस्कृती,परंपरा जोपासत शहरातील धार्मिकस्थळी दरवर्षीप्रमाणे आयोजित वार्षिक उत्सवांना शनिवारी (दि.१६) वेळ दिला. शहरातील पेठ बीडमधील श्री बालाजी मंदिरात आयोजित ब्रह्मोत्सवात सहभागी होत भगवान बालाजींची आरती करुन मनोभावे दर्शन घेतले. तसेच दुपारी शहरातील पाटांगणावरील श्रीमद् जनीजनार्दन संस्थान येथील वार्षिक पुण्यतिथी उत्सवात सहभागी होवून दर्शन घेत संत-मंहतांचे आशीर्वाद घेतले.
विधानसभा निवडणूकीची प्रचार अंतिम टप्प्याकडे सरकत असताना मतदारसंघात अधिकाधिक ठिकाणी पोहचत कॉर्नर बैठका,जाहीर सभा,पदयात्रा, रॅली असे दररोज नियमित कार्यक्रम आहेत. यातून वेळ काढत आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी संस्कृती,परंपरा जोपासत शहरातील प्रतिवार्षिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला. पेठ बीडमधील श्री बालाजी मंदिर संस्थान बीडद्वारा आयोजित श्री व्यंकटेश बालाजी भगवानचा ब्रह्मोत्सव सध्या सुरु आहे. या ठिकाणी उपस्थित राहून आ.संदीप क्षीरसागर यांनी आरती केली. तसेच श्री बालाजी मंदिर संस्थान बीड यांनी आरतीचा मान दिल्याबद्दल आभार व्यक्त करत मनोभावे भगवंतांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी श्रीमद् जनीजनार्दन संस्थान येथील वार्षिक पुण्यतिथी उत्सवानिमित्त पाटांगणकर यांच्या येथील धार्मिक कार्यक्रमांमध्ये गुरुवर्य आचार्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज यांचा आशीर्वाद घेतला.याप्रसंगी विनायक धुंडिराजमहाराज पाटांगणक यांनी श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला.
——–