गेवराई प्रतिनिधी : जातपात, धर्म यांच्या भुलथापांना बळी न पडता सर्वसमावेशक नेतृत्व म्हणुन विजयसिंह पंडित यांना विधीमंडळात पाठविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर असल्याने आपण प्रचंड मताधिक्याने विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचे आवाहन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केले. महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारात सावता परिषदेच्या वतीने आयोजित समाज बांधवांचा मेळाव्यात ते बोलत होते.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार सावता परिषदेच्या वतीने गेवराई येथे समाजबांधवांचा जाहिर प्रचार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अमरसिंह पंडित, महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे म्हणाले की, गेवराई मतदारसंघात शिवछञ परिवाराने कायम सलोख्याचे संबंध जोपासले आहेत.अनेक वंचित, उपेक्षित जात घटकांना राजकीय न्याय देण्याचे काम केलेले आहे. या मतदार संघात विकासाची गंगा आणण्याचे काम शिवाजीदादा पंडित यांच्यापासुन अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी हा वसा आणि वारसा जपलेला आहे. या निवडणुकीत जाणिवपूर्वक जात,धर्म पुढे आणला जात आहे. परंतु विरोधाकांच्या कोणत्याही भुलथापांना बळी न पडता सर्व समाजबांधवांनी ताकदीने महायुतीचे सरकार आणण्यासाठी विजयसिंह पंडित यांना विजयी करावे असेही ते यावेळी म्हणाले.
उपस्थित असताना मार्गदर्शन करताना अमरसिंह पंडित म्हणाले की आपण कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही सर्वांना सोबत घेऊन शिवछत्र परिवाराने राजकारणाबरोबर समाज कारणे होते या बळावरच आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण या निवडणुकीला सामोरे जात असून विजयसिंह पंडितांच्या माध्यमातून आपल्याला यापुढील काळात विकासाचे कामे अधिक मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी त्यांना येणारा वीस तारखेला आमदार म्हणून विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
विजयसिंह पंडित म्हणाले की गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारार्थ फिरत असताना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपण विजयाच्या टप्प्यात आलेलो आहोत. पुढील दोन-चार दिवस महत्त्वाचे आहे. आपण गाफील राहू नये. विरोधक अपप्रचार करत आहेत, त्याला न जुमानता आपण सर्वांनी मतदारापर्यंत पोहोचून एक एक मत मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे करण्याचे आवाहन त्यांनी केले
यावेळी सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ राजीव काळे, जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, माजी सरपंच उद्धव रासकर, सावता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव कदम, माजी सभापती जगनराव काळे, संचालक रमेश साखरे, श्रीहरी लेंढाळ, पंडितराव खेञे , रमेश खेञे, दादासाहेब घोडके,अॕड लगड, विजयकुमार शिंदे, लक्ष्मण देवकर, बापुराव गाडेकर,सरपंच बळीराम यादव, धनेश्वर खेञे शितल साखरे,अजय शिंदे, सतिष शिदे आदिजण उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सावता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी यांनी तर आभार सावता परिषदेचे युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष राध्येशाम लेंढाळ यांनी मानले. मतदार संघातील तरूण, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.