बीड, प्रतिनिधी- विधानसभा निवडणुकीच्या ऐन टप्प्यात बीड मतदार संघातील अनेक संघटना बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांना निःस्वार्थ पाठींबा देत आहेत तर शहर ग्रामीण भागातील तरुणांचे देखील जाहीर प्रवेश होत आहेत. काल दि. 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास इंजि. देविसिंह शिंदे यांच्या माध्यमातुन राष्ट्रीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अतिश गरड यांनी स्वत: परभणी मधुन येऊन बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांना राष्ट्रीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा देत अधिकृत पत्रक देखील दिले व विधानसभा निवडणुकीत आम्ही अनिलदादांना बहुमतांनी विजयी करणार असल्याचा निर्धार केल्याच्या भावना व्यक्त केल्या. याबरोबरच त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सूचित केले की, अनिलदादा जगताप यांनाच सहकार्य करावे आणि विक्रमी मताधिक्याने निवडून आणावे. राष्ट्रीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे अनिलदादा जगताप यांनी आभार व्यक्त केले.
शहर-ग्रामीण भागातील
शेकडो तरुणांचे जाहीर प्रवेश
बीड शहरातील अन्सार काझी, शेख रिजवान, शेख लुजेब, शेख वसीम, अकिब मिर्जा, मोसीम पटेल, शेख असेफ, शेख आमीर, शेख हकीम, शेख हकीम, शेख इराफान, शेख परवेज, शेख अबरार, शेख नुमान, शेख रिजवान, शेख आदिल, शेख कैफ, सय्यद अमन यांच्यासह असंख्य मुस्लिम तरुणांनी बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे जाहीर प्रवेश केला तर ग्रामीण भागातून अजय मस्के, तेजस मस्के, नानासाहेब मस्के, विशाल मस्के, पवन मस्के, शुभम मस्के, भरत गाडे, किशोर मस्के, राहूल मस्के, नंदकिशोर मस्के,अविनाश मस्के, बिभीषण गाडे, अशोक बोले, संतोष निकम, अभिषेक मते, कृष्णा माडेकर यांच्यासह असंख्य तरुणांनी मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे जाहीर प्रवेश केला. शहर-ग्रामीण भागतून जाहीर प्रवेश करणाऱ्या सर्व तरुणांचा अनिलदादा जगताप यांनी सत्कार करून स्वागत केले.
°°°°°