Beed : दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मोंढा रोडने नदीच्या कडेला तांदळवाडी हवेली येथील युवकाचा दगडाने ठेचून खून झाला होता. सुरुवातीला मयताची ओळख सुद्धा पटत नव्हती परंतु बीड शहर पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून यातील मयताची ओळख तर पटवली परंतु यातील सर्व चारही मारेकऱ्यांना 48 तासाच्या आत अटक केली आहे. यातील मुख्य दोन आरोपी हे खुनानंतर पुणे येथे फरार झाले होते परंतु माहिती बातमीदाराच्या पक्क्या माहितीच्या आधारे यातील राहिलेले दोनही आरोपी पुणे येथून अटक करण्यास बीड शहर पोलिसांना यश आले आहे.
आता ही दोन आरोपी अटक झाल्यानंतर खून कसा आणि का करण्यात आला याची संपूर्ण माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी खून झाला ते ठिकाण ही निर्जन ठिकाण असून त्या ठिकाणी यातील महिला आरोपी अनिता नरसिंह आदमाने रा माळीवेस बीड तिने तात्पुरते राहण्याची निवास व्यवस्था केली आहे. त्या महिलेकडे यातील मयत हा तिचा प्रियकर असून त्या महिलेकडे त्याची सतत जाणे येणे असायचे. परंतु तिच्याकडे इतर कोणी आलेले त्याला आवडायचे नाही. पुणे इथून अटक केलेले आरोपी रामु बंडू चित्रे राहणार यादवाचा मळा माळीवेस आणि गणेश वसंत माने राहणार माळीवेस चौक हे दोघे यांचे तेथे येणे जाणे वाढले होते. याचा राग सतत यातील मयत सय्यद मजर सय्यद अख्तर रा तांदळवाडी हा
घटनेच्या दिवशी रामू आणि गणेश हे दोघेजण तेथे दारू पीत बसले होते खरे म्हणजे रामूच्या मागावर पेठ बीडची पोलीस होती आणि एका गुन्ह्यात तो हवा होता म्हणून तो तिथे लपून बसायला आला होता. परंतु यातील मयात रात्री बारा वाजता च्या सुमारास तेथे येऊन रामू आणि गणेशला काठीने मारहाण करू लागला. तो एकच म्हणत असे की येथे तुम्ही माझ्या प्रेयसी जवळ का बसतात. त्यामुळे तिथून ते निघून जाऊ लागले तर नदीच्या कडेने जात असता याने परत पाठीमागून रामूला आणि गणेशला दगड मारायला सुरुवात केली. तो ऐकत नाही हे पाहून रामू आणि गणेश यांनी दोघांनी व सदर महिलाही मारायला सोबत होती त्याला दगडाने ठेचून आणि काठीचे घाव डोक्यात घालून जागीच ठार केले आणि पुन्हा त्या बाईजवळ जाऊन बसले. परंतु बाई अनिता तिने गणेशला आणि रामुला सांगितले की तो जर वाचला तर तुम्हाला तो सोडणार नाही त्यामुळे या दोघांनी पुन्हा तिथे जाऊन त्याच्या डोक्यावर दगडे टकले व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच यातील सर्व आरोपी चार ठिकाणी जाऊन बसले काहीच माहिती नाही हा बनाव केला परंतु पोलिसांनी सर्व खुनाची माहिती समोर आणली आणि सर्व आरोपीला 48 तासाच्या आत अटक केली. पुणे येथून रामू आणि बंडू याला अटक करण्यासाठी डीबी पथकाने खास मेहनत घेतली आणि माहिती गारांच्या मदत घेऊन पाठलाग करून त्यांना पुणे येथे एका ठिकाणी जाळ्यात येतात त्यांना अटक केली. त्यांना सीतापतीने अटक केल्यावर त्यांनी वरील प्रमाणे घटनेचा उलगडा केला आहे.
सदरील कारवाई, पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विश्वांबर गोल्डे, बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, बाबा राठोड Api , उमेश निकम psi,रियाज शेख psi,पोलीस अंमलदार सुशेन पवार विकी सुरवसे आयटीसीएल पोलीस नाईक जयसिंग वायकर, अश्फाक सय्यद व मनोज परजने, यांनी केली आहे.