क्षीरसागरांनी आमची मते घेऊन आम्हाला वाऱ्यावर सोडले; बीड शहरवासियांची खदखद!
बीड, प्रतिनिधी- बालाघाट अनिलदादा यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहिल्यानंतर काल दि. 11 नोव्हेंबर रोजी बीड विधानसभेचे उमेदवार अनिलदादा जगताप यांनी आपला प्रचार दौरा बीड शहराकडे वळवला. काल सकाळपासून अनिलदादा यांनी बीड शहरातील संत नामदेव नगर, बालेपीर, पंचशील नगर, खडकपुरा, हिरालाल चौक, इंद्रप्रस्थ कॉलनी, बांगरनाला, अजमेर नगर, गोरे वस्ती, ड्राइवर पॉईंट बार्शी रोड, चक्रधर नगर अशा विविध भागात कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. या बैठकात बीड शहरवासियांनी रस्ते, नाली, पाणी, कचरा, पथदिवे या मूलभूत गरजांची पूर्तता सत्ताधारी क्षीरसागर यांनी केली नाही. आम्ही क्षीरसागरांना पुरते वैतागलो असून आता क्षीरसागर मुक्त बीडसाठी आमच्यासमोर फक्त तुम्हीच एक आश्वासक चेहरा आणि नेतृत्व आहात. अनिलदादा आमची तुम्हाला पूर्ण साथ आहे. तुम्ही आमदार होऊन आमचे कैवारी बना आणि आम्हाला विकासाचा चेहरा दाखवा. आशा भावना बीड शहरवासियांनी अनिलदादांसमोर व्यक्त केल्या. उपस्थित जेष्ठ मंडळी, महिला भगिनी आणि तरुणांनी भरभरून प्रतिसाद देत दादा, यंदा तुम्हाला निवडून आणू. असा आम्ही निर्धार केला असल्याची भावना व्यक्त केली. माजी राज्य मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी मगरूर क्षीरसागरांपासून बीड मुक्त करण्याचा आम्ही प्रण केला असून आम्हाला तुमची साथ हवी आहे असे आवाहन केले. बैठकी स्थळी माजी राज्यमंत्री प्रा सुरेशजी नवले आणि अनिलदादा जगताप यांचे आगमन होताच नागरिकांकडून हृदय सत्कार करून जोरदार स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. अनिलदादा यांच्या प्रचार बैठकांचे प्रस्ताविक प्रतिक कांबळे यांनी केले. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्यासोबत सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
—–
क्षीरसागर मुक्त बीड केल्याशिवाय गप्प बसणार नाही- अनिलदादा जगताप
बीड शहरातील विविध भागात प्रचार बैठकीत शहरवासियांनी अनिलदादा यांच्यासमोर दैनंदिन समस्यांचा टाहो फोडल्यानंतर या बैठकीत जेष्ठ मंडळी, महिला भगिनी तथा युवकांच्या समस्या समजून घेऊन अनिलदादा यांनी संवाद साधताना पोकळ आश्वासन नाहीतर तर शब्द दिला की, बीडवासियांच्या मूलभूत गरजा सोडवून बीडचा विकास करण्यासाठी मी उभा आहे. सर्वसामान्य घरातील मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला एकदा संधी द्या, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तुम्हाला छळलेल्या क्षीरसागरांपासून बीड मुक्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुमचे मूलभूत प्रश्न मी सोडविल असे सांगितले. तसेच बीडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकदा आम्हाला संधी द्या, येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी सर्वनी एव्हीएम मशीनवरील अनुक्रमांक 13 चिन्ह शिवण यंत्र हे बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद द्या असे आवाहन अनिलदादा जगताप यांनी बीड शहरवासियांना केले.