जिल्हाधिकारी यांची घोषणा
जिल्ह्यात उद्यापासुन राज्यात लागु असलेले नियम राहणार
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी २६ एप्रिल ते ४ मार्च पर्यंत लाॅकडाऊनची घोषणा केली होती. त्या निर्णयाची मुदत आज मध्यराञी संपणार होती. आज (ता. ०४) जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात जिल्हात पुन्हा लाॅकडाऊन न केल्यामुळे जिल्हाकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु राज्याने लागु केलेले नियम माञ जिल्ह्यात लागु राहणार आहेत.
जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत नसल्यामुळे जिल्ह्यात दहा दिवसाचे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्याची मुदत आज मध्यराञी संपत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज नविन आदेश काढत जिल्ह्यात कडक निर्बंध असतील, त्याचे पालन नागरिकांनी करावे अशा सुचना केल्या. जिल्हाधिकारी यांनी लाॅकडाऊनची मुदत न वाढवल्यामुळे जिल्हाकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु बीडसह राज्यात कोरोना वाढत असल्यामुळे राज्य सरकारने उद्या पासुन राज्यात कडक नियम लागु करण्याची घोषणा केलेली आहे. यामुळे राज्याने लागु केलेले नियम जिल्ह्यात लागु राहणार आहेत. यासह इतर कडक नियम जिल्ह्यात लागु केले आहेत.
आता लाॅकडाऊन नाही पण घबरदारी घ्या
जिल्ह्यात पुन्हा लाॅकडाऊन लागु केले नसले तरी जिल्ह्यात कोरोना माञ अजुनही आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी यापुढे घबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.