नाळवंडी, ढेकणमोह मध्ये कॉर्नर सभा
बीड प्रतिनिधी :- यंदा तुतारी वाजवायची म्हणजे वाजवायची आणि परत एकदा तुम्हाला विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठवायचे अशी, जनभावना ग्रामीण भागातून व्यक्त होत असून मायबाप जनतेच्या या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. असे आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या कॉर्नर सभेदरम्यान म्हटले.
रविवारी (दि.१०) रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी बीड तालुक्यातील नाळवंडी व ढेकणमोह येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी या भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. आ.क्षीरसागर यांना सर्वसामान्यांतून अतिशय सकारात्मक प्रतिसाद भेटत आहे. भेटीगाठी दरम्यान आ.क्षीरसागर यांनी, येत्या २० नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आशिर्वाद उपस्थितांकडे मागितले. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गोरख शिंगण तसेच या भागातील नागरिक, तरूण, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.