महामार्ग पोलीस यांच्या पुढाकाराने चालकांचे डोळे तपासणी शिबिर
Beed : सुरक्षा सप्ताह 2023 अंतर्गत महामार्ग पोलीस उपकेंद्र गेवराई यांच्या अंतर्गत महामार्गावर चालणारे ड्रायव्हर यांचे डोळे तपासणी शिबिर आयोजित...
Beed : सुरक्षा सप्ताह 2023 अंतर्गत महामार्ग पोलीस उपकेंद्र गेवराई यांच्या अंतर्गत महामार्गावर चालणारे ड्रायव्हर यांचे डोळे तपासणी शिबिर आयोजित...
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठोंब्या ठोंबीची गोष्ट या नाटकाचे दिमाखदार सादरीकरण सहारा अनाथालयाच्या बाल कलावंतांनी जिंकली उपस्थितांची मने बीड/प्रतिनिधी :...
बीड प्रतिनीधी :- ADFC चषक मुळे क्रिकेट मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या नवतरुणांना संधी उपलब्ध होत आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हा...
बीड प्रतिनिधी - बीड मतदार संघातील पिंपळनेर ते बाबुळवाडी आणि बाबुळवाडी ते गुंदाआडगाव गाव या 7 किलोमीटर रस्त्यासाठी आणि नाळवंडी...
पालसिंगन येथे भाजपा शाखेची स्थापना..! बीड : गावखेड्यापासून देशभरात भारतीय जनता पार्टीचे जनमत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोकहिताचे निर्णय घेण्याची क्षमता आणि विकासाचे कामे करण्याची धमक भाजपा संघटनेतील नेतृत्वात आहे. तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमतून मोठ्या प्रमाणात विकास झाला. आज जिल्ह्यात विकासाचा अनुशेष भरून काढण्याची गरज आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे बीड विधानसभा मतदार संघात विकास थांबला.उटसूट वादविवाद चालू असून,सत्ता आणि संपत्तीच्या लोभापायी सत्तेचा दुरुपयोग चालू आहे. आगामी काळात प्रस्तापितांना धडा शिकवण्यासाठी मतदार बांधव सज्ज आहे. बीड मधील जनतेने कधी हा तर कधी तो प्रस्तापित क्षीरसागरांना कौल दिला. प्रस्तापित कुटुंबातील व्यक्तीला संधी देऊन जनतेने कटू अनुभव घेतला. आता सामान्य कुटुंबातील शिक्षकाचा मुलगा राजेंद्र मस्के यांना संधी द्यावी. व विधानसभेत आपल्या हक्काचा आमदार पाठवावा. दिल्लीपासून बीड पर्यंत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटन कामात बहुमूल्य वेळ द्यावा. प्रस्तापितांना तडीपार करून बीड विधानसभेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार असा विश्वास जिल्हा सरचिटनिस ॲड. सर्जेराव तांदळे यांनी व्यक्त केला. बीड तालुक्यातील पालसिंगन येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते भाजपा शाखेची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जि.प. सदस्य अशोक लोढा, माजी सभापती नवनाथ शिराळे,विजयकुमार पालसिंगनकर,शरदराव झोडगे, पवन कुचेकर, भाऊसाहेब सावंत,दुष्यंत डोंगरे,हानुमान आण्णा मस्के, अमर सानप, भाऊसाहेब सावंत, बद्रीनाथ जटाळ, उपसरपंच लालासाहेब पन्हाळे, अंकुश गायकवाड, गणेश वाणी, पांडुरंग वाणी, अभिजित गायकवाड,संपत कोटुळे, बाळासाहेब गात, अजय ढाकणे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दुष्यंत डोंगरे यांनी केले. पालसिंगन भाजपा शाखेचे खालील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शाखा अध्यक्ष अमोल डंबरे, उपाध्यक्ष समाधान जगताप, सचिव लक्ष्मण जगताप, सहसचिव प्रदिप डंबरे, कोषाध्यक्ष संतोष जगताप, सदस्य- अरविंद कुरूंद, ज्ञानेश्वर डंबरे, ज्ञानेश्वर जगताप, प्रदिप जगताप, प्रशांत डंबरे, काकासाहेब खंडागळे, रंजित डंबरे,राम जगताप, शंकर डंबरे,बबन जगताप,अजय डंबरे,हरी खंडागळे, कृष्णा मोळवने यांची उपस्थिती होती.
Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.
Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.