बीड(प्रतिनिधी) लोकभावना कायम कशी असते? आणि लोक कोणाच्या पाठीशी नेहमी राहतात हे सांगण्यासाठी सरपंच-उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांचा जनता दरबार पहावा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खांडेंचा प्रशासनामध्ये असलेला दबदबा आणि जनतेमधून असलेली प्रेमाची नाळ ही कालच्या सोमवार दि.7 ऑक्टोबरच्या जनता दरबारातून दिसून आली. जनतेच्या मनामधील एक सक्षम नेतृत्व म्हणून खांडेंची प्रसिध्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
शासकिय कार्यालय, आरोग्य, प्रशासकिय कामे,पोलीस ठाणे आदि कोणत्याही ठिकाणी जी कामे लवकर मार्गी लागत नाहीत त्या कामांना गती देण्याचा यशस्वी प्रयत्न बीड जिल्ह्यात सरपंच-उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांच्या जनता दरबारातून झाला. दोन महिन्याच्या राजकिय विजनवासानंतर खांडे दि.23 सप्टेंबर रोजी घेतला पहिला जनता दरबार डबल हाऊसफुल्ल ठरला होता. त्यानंतरचा दुसरा जनता दरबार सुध्दा त्यापेक्षा डबल हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. खांडेंच्या दरबारातील गर्दी पहिल्या पेक्षा अधिक होती. खांडे यांच्याकडून होणारा कामाचा पाठपुरावा ही तोच आणि सर्वसामान्यांच्या चेहर्यावर काम मार्गी लागल्याचेही समाधान तेच होते. जनतेच्या सेवेसाठी मी कायम प्रयत्नरत असतो. यापुढेही त्यांची अपेक्षापुर्ती होत राहिल यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करील असे कुंडलिक खांडे यांनी सांगितले.
अ बीड जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात सर्वात पहिल्यांदा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच, उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी फेब्रुवारी 2024 पासून दर सोमवारी जनता दरबार घेतला होता. दर सोमवरी सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान श्री.खांडे सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेत होते. गत दोन महिन्याच्या राजकिय विजनवासानंतर कुंडलिक खांडे हे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून बीडकरांच्या प्रश्नांसाठी एकच उपाय म्हणून खांडेंच्या दरबाराकडे पाहिले जावू शकते. या दरबारात नागरिक आपल्या व्यथा मांडल्या. त्यावर खांडे यांनी थेट संबंधित अधिकार्याला फोन लावून जाब विचारत आहेत. प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. जी कामे लोक घेवून येतात, त्यांचा शक्यतो त्याच ठिकाणी पाठपुरावा झाल्याचे दिसून आले. नोकरी, बदली, विकास कामे, तक्रारी, कौतुक, आर्थिक मदत या प्रसंगी करण्यात आली. या जनता दरबारात खांडे यांनी प्रत्येकाला भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि तात्काळ ते सोडवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या.