शिवसेनेची बीड विधानसभा संवाद दौरा मेळावा पूर्व नियोजन बैठक संपन्न
बीड, प्रतिनिधी- शिवसेना नेते संसदरत्न खासदार मां. डॉ श्रीकांत शिंदे साहेबांचा बीड विधानसभा संवाद दौरा विजयाकडे घेऊन जाणारा ठरला पाहिजे. बीड मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि सध्या सर्वात जास्त अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार यात शंका नाही.जिल्हाप्रमुखामध्ये अनिलदादा जगताप मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत. दादांच्या कार्य पद्धतीवर शिंदे साहेबांचा विश्वास आहे. दादांना शिंदे साहेबांकडे विशेष आदर सन्मान आहे. आपल्याकडे दोन माहीने राहिलेत. येणारे दोन माहीने पक्षाला द्या. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करा. बीड मतदार संघावर आपली चांगली पकड आहे, आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे येणारी निवडणुका आपल्याला मोठ्या ताकदीने लढावी लागणार आहे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा मराठवाडा संपर्कनेते अर्जुनजी खोतकर साहेब यांनी केले.
संसदरत्न खा. डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांचा येत्या 8 ऑक्टोबर रोजी बीड विधानसभा संवाद दौरा मेळावा संपन्न होणार आहे. याच अनुषंगाने काल दि. 5 ऑक्टोबर 2024 रोजी दु. 3.00 वाजता दरम्यान बीड शहरातील हॉटेल ग्रँड यशोदा येथे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा संपर्कनेते अर्जुनजी खोतकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी बैठक पडली.
या बैठकीमध्ये अर्जुनजी खोतकर साहेब यांनी खा. डॉ श्रीकांत शिंदे साहेब बीड मतदार संघात पहिल्यांदा येत असून त्यांच्या संवाद दौरा मेळाव्या बाबत महत्वपूर्ण सूचना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, येणारा काळ शिवसेनेचा आणि शिवसैनिकांच्या भगव्याचा असून महाराष्ट्रावर भगवा फडकविण्यासाठी एकजूट होऊन ताकदीने विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचे सांगितले. बीडची जागा ही शिवसेनेची आहे व ती शिवसेनेलाच सुटेल यात शंका नाही असे त्यांनी सांगितले.
यादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले व दोघांनी मिळून बीड मतदार संघात शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समस्या अर्जुनराव खोतकर यांच्यासमोर मांडल्या. या बैठकीसाठी बीड जिल्हा शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, सर्व अंगीकृत संघटनेचे आजी- माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी घेणाऱ्या नाही देणाऱ्या पक्षात आहे- अनिलदादा जगताप
खूप दिवसांपासून अन्याय सहन करतोय. प्रत्येकवेळी मला थांबवण्यात आले व माझा पाय ओढण्यात आला. मात्र आता मी आता घेणाऱ्या नाही देणाऱ्या पक्षात आहे.
बीड मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. कार्यकर्त्याला मोठं करण्यची, त्यांना ताकद देण्याची दानत मुख्यमंत्री शिंदे साहेबांमध्ये आहे व शिंदे साहेबांचा आशीर्वाद, विश्वास आणि पाठबळ माझ्यासोबत आहे म्हणून मला यावेळी कसलीच चिंता राहिली नाही. शिवसैनिकांनो, अफवांवर विश्वास ठेऊ नका बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार आहे. त्यामुळे कामाला लागा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी बीड विधानसभा संवाद दौरा पूर्व नियोजन बैठकीत आपल्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना केले.