बीड, अंबाजोगाई, आष्टी, केज तालुक्यात रुग्णसंख्या जास्त
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात लॉकडाऊन असले तरीही कोरोना मात्र थांबायचे नाव घेताना दिसत येत नसून आज जिल्ह्यात तब्बल 393 नव्या रुग्णांची भर पडली. यात बीड, अंबाजोगाई, आष्टी, केज सह माजलगाव तालुक्यात जास्त रुग्ण आढळून आले. लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनासह बीडकरांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.

आज आरोग्य विभागाकडून 2956 अहवालाचा रिपोर्ट प्राप्त झाला. यात 2563 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 393 रिपोर्ट हे पॉझीटिव्ह आले. यात बीड-127, अंबाजोगाई-65, आष्टी-45, गेवराई-11, गेवराई-33, धारूर-4, माजलगाव-34, परळी-34, पाटोदा-26, शिरूर-5, वडवणी-9 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले. कोरोनाला हरवण्यासाठी केंद्र व राज्य शासन, जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कोव्हिड नियमांचे पालन करून ही कोरोनाची लढाई जिंकायची आहे.