जि.प.सदस्य विजयकांत मुंडेंचा यशस्वी पाठपुरावा…
केज ! प्रतिनिधी
*माजी ग्रामविकास मंत्री तथा लोकनेत्या पंकजाताई मुंडे व जिल्याच्या खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्याकडे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिखलबीड-जिवाचीवाडी-लव्हुरी-कानडीमाळी ते केज तालुका हद्दी पर्यंत विडा जि.प.गटातून जाणार्या प्रमुख जिल्हा मार्गासाठी विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून निधी देण्याची मागणी केल्यानंतर लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारच्या 2018-2019 च्या अर्थसंकल्पात तब्बल 2.50 कोटींचा निधी मंजूर केला होता.त्यानंतर केजच्या आ.नमिताताई मुंदडा यांनी तात्काळ काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रत्यक्षात कामाला सुरूवात करण्यात आली होती.आजच्या घडीला लव्हुरी ते कानडी रस्त्याचे काम वेगाने सुरू आसून काम प्रगतिपथावर आले आहे.तर जिवाचीवाडी येथिल साठवण तलावावरील पुल व लमानतांड्या जवळील १ कि.मी. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे कामही लवकरच सुरू होणार आहे.त्यामुळे येथिल जनतेकडून लोकनेत्या पंकजाताई मुंडे व विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांचे आभार मानले जात आसून सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे*
चौकट
*जि.प.सदस्य विजयकांत मुंडेंचा यशस्वी पाठपुरावा..*
चिखलबीड-जिवाचीवाडी-लव्हुरी-कानडीमाळी-ते केज तालुका हद्दी पर्यंत विडा जिल्हा परिषद गटातुन जाणार्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामासाठी निधी देण्याची मागणी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडें यांनी केल्यानंतर तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी 2018-2019 च्या अर्थसंकल्पात 2.50 कोटींची तरतूद केली होती.त्यामुळे जि.प.सदस्य विजयकांत मुंडेंनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आसून येथिल जनतेच्या जिव्हाळ्याचा १० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
चौकट
*रस्त्याचे काम देखिल दर्जेदार*
सध्या रस्त्याचे काम थातूरमातूर झाल्याच्या अनेक तक्रारी असतात परंतु सदरील रस्त्याचे काम केजच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने कामही दर्जेदार झाल्याचे दिसून येत आहे.